शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले...
2
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
3
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
4
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
5
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
6
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
7
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
8
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
9
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
10
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
11
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
12
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
13
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
14
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
15
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
16
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
17
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
18
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
19
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
20
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन

'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 17:38 IST

गेल्या काही वर्षांमध्ये भारताचे मुस्लिम देशांची व्यापारीक संबंध मजबूत झाले आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये भारताचे मुस्लिम देशांची संबंध दिवसेंदिवस मजबूत होत आहेत. एकीकडे भारताचे पाकिस्तनसोबतचे संबंध दिवसेंदिवस बिघडत आहेत, तर दुसरीकडे सौदी, इराण, यूएईसारख्या देशांसोबतचे व्यावारीक संबंध मजबूत होत आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर तर अनेक देशांनी घटनेचे खंडन करताना, पाकिस्तानलाही सुनावले. दरम्यान, आता पाकिस्तानचा मित्रराष्ट्र असलेल्या यूएईने भारताचे कौतुक केल्यामुळे पाकिस्तानला आणखी मिरची लागली आहे. 

यूएईचे राजदूत अब्दुलनासेर अलशाली म्हणाले की, भारतीय नागरिकांसाठी यूएईच्या व्हिसा ऑन अरायव्हल कार्यक्रमाचा विस्तार हा भारतासोबतच्या त्यांच्या कायमस्वरुपी भागीदारीचे प्रतिबिंब आहे. हे एक व्यावहारिक पाऊल आहे, जे कुटुंबांना पुन्हा एकत्र येणे, व्यावसायिकांना सहकार्य करणे आणि सीमा ओलांडून व्यवसाय वाढवणे सोपे करेल. दोन गतिमान आणि दूरदर्शी राष्ट्र म्हणून, आम्ही आमच्या लोकांमध्ये आणि अर्थव्यवस्थेमध्ये आणखी मजबूत पूल बांधण्यासाठी वचनबद्ध आहोत, असेही त्यांनी सांगितले. 

नवी दिल्लीतील यूएई मिशनने भारतीय नागरिकांसाठी वाढीव व्हिसा ऑन अरायव्हल धोरणाचे महत्त्व अधोरेखित कराना, द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे वर्णन केले आहे. दरम्यान, भारत यूएईच्या पर्यटन यशाचा आधारस्तंभ बनला आहे. एका अंदाजानुसार २०२३ मध्ये सुमारे ४.५ मिलियन भारतीयांनी यूएईला भेट दिली. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान, न्यूझीलंड, कोरिया प्रजासत्ताक आणि सिंगापूर येथून वैध निवास परवाने असलेले भारतीय पासपोर्ट धारक यूएईच्या सर्व प्रवेश बिंदूंवर व्हिसा ऑन अरायव्हल मिळविण्यास पात्र असतील. 

गेल्या काही वर्षांपासून भारत-यूएई द्विपक्षीय संबंध वाढत आहेत. ऑगस्ट २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक यूएई भेटीनंतर, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध व्यापक धोरणात्मक भागीदारीपर्यंत पोहोचले. २०२२ मध्ये दोन्ही बाजूंनी व्यापक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी केल्यानंतर द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंध लक्षणीयरीत्या विस्तारले. यूएई दूतावासाने एका निवेदनात म्हटले की, यूएई आणि भारतासारख्या खोल आर्थिक, सांस्कृतिक आणि धोरणात्मक संबंध असलेल्या देशांसाठी, गतिशीलता केवळ आवश्यक नाही तर परस्पर विश्वासाचे प्रतीक देखील आहे.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीbusinessव्यवसायInvestmentगुंतवणूक