पॅलेस्टिनींना भारत करणार मदत; पंतप्रधान मोदींची अब्बास यांच्याशी चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 06:43 IST2023-10-20T06:42:55+5:302023-10-20T06:43:09+5:30
पॅलेस्टाईनमधील जनतेकरिता भारत मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत पाठविण्याचे कार्य सुरूच ठेवणार आहे.

पॅलेस्टिनींना भारत करणार मदत; पंतप्रधान मोदींची अब्बास यांच्याशी चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : गाझातील रुग्णालयावर झालेल्या रॉकेट हल्ल्यात ५०० नागरिक ठार झाले. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष
महमूद अब्बास यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तीव्र शोक व्यक्त केला.
मोदी यांनी म्हटले आहे की, पॅलेस्टाईनमधील जनतेकरिता भारत मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत पाठविण्याचे कार्य सुरूच ठेवणार आहे. इस्रायल-पॅलेस्टाईनच्या भागात सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया, हिंसाचार व सुरक्षा व्यवस्थेच्या बिघडलेल्या स्थितीनेे चिंता वाटते.
इस्रायल-पॅलेस्टाईनच्या प्रश्नावर भारताने पूर्वीपासून घेतलेल्या भूमिकेचा मोदींनी पुनरुच्चार केला. कोणत्याही संघर्षात नागरिक मरण पावतात ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. अशी कृत्ये करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे, असेही मोदी म्हणाले.