शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

"भारत तुमच्या पाठीशी आहे" पंतप्रधान मोदींच्या पत्राला पॅलेस्टाईनने दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 11:39 IST

आम्ही पंतप्रधान मोदींच्या संदेशाचे स्वागत करतो आणि त्यांचे कौतुक करतो, असं पॅलेस्टाईनने म्हटले

PM Modi on Palestine : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅलेस्टाईनमधील सुरक्षा आणि मानवतावादी परिस्थितीवर चिंता व्यक्त केली होती. पॅलेस्टाईनच्या लोकांच्या विकासासाठी भारताच्या पाठिंब्याचा पंतप्रधान मोदींनी पुनरुच्चार केला होता. दुसरीकडे, संयुक्त राष्ट्र महासभेत भारताने इस्रायलच्या विरोधात आणलेल्या ठरावाच्या बाजूने मतदान केले आहे. अशातच पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर पॅलेस्टाईनने प्रतिक्रिया दिली आहे. मानवतावादी मदत देण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचे त्यांनी स्वागत केले आहे.

भारतातील पॅलेस्टाईन दूतावासाचे प्रभारी आबेद एलराजेग अबू जॅझर यांनी बुधवारी पॅलेस्टिनी लोकांसोबत आंतरराष्ट्रीय एकता दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून त्यांचे कौतुक केले. पंतप्रधान मोदींनी पॅलेस्टिनी राज्याच्या स्थापनेसाठी भारताने समर्थन दिलंय आणि पॅलेस्टाईनला मानवतावादी मदत देण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचे स्वागत करतो असं जॅझर यांनी म्हटलं आहे.

आम्ही पंतप्रधान मोदींच्या समर्थनाचे स्वागत करतो. पंतप्रधानांच्या संदेशाने पॅलेस्टिनी राज्याच्या स्थापनेला आणि द्विराज्य समाधानासाठी भारताने समर्थन दिलं आहे. जे साध्य करण्याचा पॅलेस्टिनी लोक प्रयत्न करत आहेत. गाझावरील इस्रायलचे युद्ध थांबवण्यासाठी तातडीने युद्धविराम करण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाचे आम्ही स्वागत आणि समर्थन करतो, असे अबू जॅझर म्हणाले.

अबू जाझर यांनी संयुक्त राष्ट्रांच्या मदत आणि कार्य संस्थेद्वारे संयुक्त राष्ट्रांना भारताच्या समर्थनावर प्रकाश टाकला आणि पॅलेस्टिनी निर्वासितांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र आणि त्यांच्या संस्थांना भारताच्या समर्थनाचा पुनरुच्चार केला. पॅलेस्टिनी लोकांच्या दैनंदिन जीवनात बदल घडवून आणण्यासाठी या प्रदेशात संयुक्त राष्ट्रसंघाला सतत पाठिंबा देण्याचे भारताचे समर्थन हे संयुक्त राष्ट्रांना त्याच्या विविध संस्थांमध्ये भारत समर्थन देत आहे, असा आमचा विश्वास आहे, असं अबू जॅझर यांनी म्हटलं.

पंतप्रधान मोदींनी काय म्हटलं?

२९ नोव्हेंबर रोजी पॅलेस्टिनी लोकांसोबत आंतरराष्ट्रीय एकता दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताकडून समर्थन दिलं होतं. पॅलेस्टिनी लोकांना त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी पाठिंबा देण्याच्या भारताच्या वचनबद्धतेवर त्यांनी भर दिला. "पॅलेस्टिनी लोकांसोबतच्या आंतरराष्ट्रीय एकता दिनानिमित्त, मी  भारताच्या अटल समर्थनाचा पुनरुच्चार करतो. पॅलेस्टाईनच्या मैत्रीपूर्ण लोकांसोबतचे भारताचे संबंध आपल्या सामायिक इतिहासात दडलेले आहेत. पॅलेस्टिनी लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला आम्ही सन्मानाने आणि स्वावलंबनाने नेहमीच पाठिंबा दिला आहे. आम्हाला आशा आहे की पॅलेस्टिनी आणि इस्रायली बाजूंमध्ये सर्वसमावेशक आणि तोडगा काढण्यासाठी थेट वाटाघाटी पुन्हा सुरू होतील. गेल्या काही वर्षांत पॅलेस्टाईनला मदत देण्यातही भारत आघाडीवर आहे," असं पंतप्रधान मोदींनी पत्रात म्हटलं होतं.

टॅग्स :Palestineपॅलेस्टाइनIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी