शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

भारताचा नवा 'प्लॅन'! मोदींचे 'मिशन मॉरिशस' देणार मालदीवमधील चीनच्या खेळीला टक्कर?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2024 12:54 PM

राष्ट्रपती मुर्मू यांचा मॉरिशस दौरा म्हणजे चीनचे डावपेच उद्ध्वस्त करण्याचे नवे धोरण मानले जात आहे

India's Mission Mauritius vs China Maldives: २०१५ मध्ये मॉरिशसच्या अधिकृत भेटीदरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसला “लिटल इंडिया” असे संबोधले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा राजकीय दौरा याच मॉरिशसमध्ये होणार आहे. द्रौपदी मुर्मूंची ही भेट म्हणजे मालदीवमधील चीनचे डावपेच उद्ध्वस्त करण्याचे नवे धोरण मानले जात आहे. द्रौपदी मुर्मूंची ही भेट ११ ते १३ मार्च दरम्यान होणार आहे. मुर्मू या मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून सहभागी होणार आहेत. मॉरिशसचा राष्ट्रीय दिवस १२ मार्च रोजी साजरा केला जातो. दोन्ही देशांमधील राजकीय संबंध १९४८ मध्ये प्रस्थापित झाले होते. त्यानंतर सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

पूर्ण कार्यक्रम काय?

२००० या वर्षापासून मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणाऱ्या द्रौपदी मुर्मू या सहाव्या भारतीय राष्ट्रपती आहेत. या समारंभात भारतीय नौदलाची तुकडी आणि दोन युद्धनौकांसह INS तीर आणि CGS सारथी देखील सहभागी होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भारत मॉरिशससोबत १४ करार करू शकतो. मोदी सरकारच्या सागर धोरणांतर्गत मॉरिशसमध्ये सहा नवीन प्रकल्पही पूर्ण होणार आहेत. या दौऱ्यात त्या अनेक बड्या नेत्यांनाही भेटणार आहेत. यावर्षी २९ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांनी हवाई तळ आणि नौदल बंदर विकसित करण्यास हिरवा कंदील दाखवला होता.

लष्करी तळ महत्त्वाचा का?

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा हा दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा मालदीवचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू सत्तेवर आल्यानंतर भारतासोबतचे मालदीवचे संबंध बिघडू लागले आहेत. त्यांची चीनशी जवळीक वाढत आहे. या दरम्यान, एक बातमी अशीही आली आहे की, १० मार्चपासून भारताने मालदीवमधून आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली आहे. पूर्वनिर्धारित मुदतीनुसार भारतीय सैन्य मालदीवमधून माघार घेतील. या दरम्यान, मुर्मू यांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मॉरिशस बेट ज्यावर भारत आणि मॉरिशस संयुक्तपणे लष्करी तळ बांधत आहेत ते मॉरिशसच्या मुख्य बेटापासून ११०० किलोमीटर अंतरावर आणि मालदीव, सेशेल्स आणि अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या डिएगो गार्सियाच्या मध्यभागी आहे. त्यामुळेच ते लष्करी रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.

टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मूchinaचीनIndiaभारतMaldivesमालदीवPresidentराष्ट्राध्यक्ष