शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार; मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच 'असं' घडणार
2
Gold Silver Price Today: २०२६ मध्येही सोन्या-चांदीची चमक कायम; चांदी ५६५६ रुपयांनी महागली, सोन्यातही जोरदार तेजी
3
'पाकिस्तानला उखडून टाका, आम्ही भारताबरोबर'; 'पाक'मधून कोणत्या नेत्याने लिहिले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना ओपन लेटर?
4
"ज्यांच्यामुळे श्वास गुदमरत होता, ते आता च्यवनप्राश देताहेत का?" आशिष शेलारांचा राज ठाकरेंना सवाल
5
वंचित, एमआयएमने काँग्रेसची वाट केली 'बिकट'! महापालिका निवडणुकीत आमदाराचा लागणार 'कस'
6
व्होडाफोन-आयडियाला मोठा झटका! नोव्हेंबरमध्ये १० लाखांहून अधिक ग्राहकांनी सोडली साथ...
7
काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे खिंडार; अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला, शिवसेना शिंदे गटात प्रवेश
8
कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेचा कधीही न पाहिलेला बोल्ड लूक, दिसतेय इतकी हॉट की फोटोंवरुन नजरच हटणार नाही
9
“आता मोदींचा फोन आला तरी माघार नाही, अपक्ष लढणारच”; तिकीट नाकारताच भाजपा नेत्याचा एल्गार
10
Virat Kohli जगातील सर्वात हँडसम क्रिकेटर, त्याचा लूक...; युवा Vaishnavi Sharma किंगवर फिदा
11
समुद्राची गाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट! नवीन वर्षात भारताच्या 'या' ५ हिडन समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या
12
MCX च्या शेअरमध्ये ८० टक्क्यांची घसरण? घाबरू नका, गुंतवणूकदारांसाठी आहे का मोठी संधी?
13
नागपुरात भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनीच घरात कोंडलं, गावंडे म्हणाले, "पाया पडतो, मला..."
14
Vastu Tips: आर्थिक चणचण असो नाहीतर वास्तू दोष; तुरटीचा छोटा तुकडा बदलेल तुमचे नशीब 
15
“मोहन भागवत हिंदीत बोलतात, मराठीत बोलताना कधी ऐकले आहे का?”; संजय राऊतांची RSSवर टीका
16
Nashik Municipal Election 2026: नाशिकमध्ये उद्धवसह राज यांची संयुक्त सभा! ठाकरे ब्रँडच्या जादूसाठी प्रयत्न
17
भाजपच्या आणखी दोन जागा बिनविरोध; प्रभाग 19 मधून दर्शना भोईर तर प्रभाग 20 मधून अजय बहिरा बिनविरोध
18
मूळ पाकिस्तानी असलेला 'हा' वादग्रस्त क्रिकेटर निवृत्त; ऑस्ट्रेलिया टीममध्ये केले होते मोठे कांड
19
धक्कादायक! भारतात महिला कैद्यांच्या संख्येत विक्रमी १६२% वाढ; पुरुष कैद्यांच्या वाढीच्या तुलनेत वेग दुप्पट!
20
काँग्रेसच्या सर्व्हेनेच राहुल गांधींचा दावा खोटा ठरवला! लोकांचा ईव्हीएमवर विश्वास
Daily Top 2Weekly Top 5

रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 07:25 IST

India Russia Relations: पुढील महिन्यात रशियाचे अध्यक्ष पुतिन नवी दिल्लीत येणार आहेत

India Russia Relations: रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या भारत भेटीपूर्वी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर मॉस्को येथे पोहोचले. त्यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील द्विपक्षीय भागीदारीबद्दल चर्चा केली. त्यांनी २३ व्या वार्षिक भारत-रशिया शिखर परिषदेच्या तयारीचाही आढावा घेतला. "मॉस्कोमध्ये परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांना भेटून आनंद झाला. व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा, गतिशीलता, शेती, तंत्रज्ञान, संस्कृती आणि लोकांमधील देवाणघेवाण यासह आमच्या द्विपक्षीय भागीदारीवर चर्चा केली," असे त्यांनी X वरील एका पोस्टमध्ये नमूद केले.

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्याशी भेट

पुढील महिन्यात रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या नवी दिल्ली भेटीदरम्यान संबंध अधिक मजबूत करण्यासाठी भारत आणि रशिया अनेक करार, उपक्रम आणि प्रकल्प मजबूत करण्याचा विचार करत आहेत. या भेटीच्या तयारीचा एक भाग म्हणून, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मॉस्कोमध्ये त्यांचे रशियन समकक्ष सर्गेई लावरोव्ह यांच्याशी व्यापक चर्चा केली. बैठकीतील भाषणात जयशंकर म्हणाले, "२३ व्या वार्षिक शिखर परिषदेसाठी राष्ट्रपती पुतिन यांच्या भारत भेटीची तयारी करत असताना हा विशेष प्रसंग माझ्यासाठी आणखी महत्त्वाचा बनला आहे.

"विविध क्षेत्रांमध्ये अनेक द्विपक्षीय करार, उपक्रम आणि प्रकल्पांवर चर्चा सुरू आहे. येत्या काही दिवसांत त्यांना अंतिम रूप देण्याची आमची अपेक्षा आहे. आगामी भेट ही आमच्या विशेष आणि धोरणात्मक भागीदारीला अधिक बळकटी देईल आणि आकार देईल असा मला विश्वास आहे," असे ते म्हणाले.

रशिया-युक्रेन संघर्ष संपवण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा

जयशंकर यांनी असेही सांगितले की भारत हा रशिया-युक्रेन संघर्ष संपवण्याच्या अलिकडच्या प्रयत्नांना पाठिंबा देतो. त्यांनी पुढे म्हटले की भारत शांततेचे समर्थन करतो. त्यामुळे युद्ध थांबले पाहिजे या विचारांना भारताचाही पाठिंबा आहे. आम्हाला आशा आहे की सर्व देश या ध्येयाकडे रचनात्मकपणे वाटचाल करतील."

दरम्यान, डिसेंबरमध्ये पुतिन भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Jaishankar in Moscow before Putin's India visit: Discussions held.

Web Summary : Ahead of Putin's visit, Jaishankar met Lavrov in Moscow, discussing bilateral ties and preparing for the annual summit. They focused on trade, energy, and various collaborations, aiming to strengthen the strategic partnership. India supports efforts to resolve the Russia-Ukraine conflict, advocating for peace.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाS. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारत