शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींसोबत कारमध्ये काय चर्चा झाली? पुतिन यांनी सांगितला चीनमधील 'तो' किस्सा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 16:16 IST

India-Russia : पीएम मोदी आणि पुतिन भेटीत संरक्षण, व्यापार, ऊर्जा, शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये चर्चा होईल.

India-Russia : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आज(दि.4) सायंकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. तत्पुर्वी त्यांनी पीएम मोदींसोबत कारमधील प्रवासाची माहिती दिली. चीनमधील तियानजिन येथे झालेल्या 25व्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेदरम्यान दोन्ही नेत्यांनी एकाच कारमधून प्रवास केला होता, त्याची जगभरात चर्चा झाली होती.

कारमध्ये खूप गप्पा मारल्या...

इंडिया टुडे ग्रुपला दिलेल्या मुलाखतीत पुतिन म्हणाले, कोणतीही पूर्वतयारी नव्हती, ते सहज घडले. आम्ही दोघे बाहेर पडलो आणि समोर माझी कार दिसली. मी मोदींना म्हटले, चला, एकत्र जाऊ. त्यापलीकडे यात काही विशेष नव्हते. या प्रवासात आम्ही नेहमीप्रमाणे मित्रांसारखे संवाद करत होतो. आमच्याकडे नेहमी चर्चा करण्यासारखे अनेक विषय असतात. आम्ही इतके गप्पांत रमलो की, लोक आमची वाट पाहत आहेत, हेही लक्षात आले नाही.

नरेंद्र मोदी कुणासमोर झुकत नाहीत

पीएम मोदींच्या नेतृत्वाबद्दल बोलताना रशियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, नरेंद्र मोदी कुणाच्याही दबावाखाली झुकणारे नेते नाहीत. अमेरिका भारतावर टॅरिफच्या माध्यमातून दबाव आणत असल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांनी हा मोठा विधान केला आहे. पुतिन पुढे म्हणतात, जगाने भारताची ठाम आणि स्पष्ट भूमिका पाहिली आहे. भारताने आपल्या नेतृत्वाचा अभिमान बाळगवा. भारत-रशियामधील 90% पेक्षा जास्त द्विपक्षीय व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत, ज्यातून दोन्ही देशांमधील आर्थिक आणि रणनीतिक भागीदारी किती स्थिर आहे, हे दिसून येते.

भारताने 77 वर्षांत मोठी झेप घेतली

पुतिन यांनी भारत-रशिया संबंधांच्या ऐतिहासिक आणि अनोख्या स्वरुपाचा उल्लेख करत सांगितले की, चर्चेसाठी असंख्य विषय आहेत. प्रामुख्याने संरक्षण, व्यापार, ऊर्जा, शिक्षण आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये सहकार्यावर चर्चा होईल. भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या प्रगतीबद्दल बोलताना ते म्हणाले, केवळ 77 वर्षांत भारताने उल्लेखनीय विकास साधला आहे. हा कालखंड इतिहासाच्या दृष्टीने मोठा नाही, पण भारताची प्रगती विलक्षण आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Putin reveals details of car ride conversation with PM Modi.

Web Summary : Putin disclosed details of his car ride with PM Modi at SCO summit, emphasizing their friendly chat and Modi's independent leadership. He highlighted strong Indo-Russian ties, successful bilateral trade, and India's remarkable 77-year progress across sectors like defense, trade and technology.
टॅग्स :russiaरशियाIndiaभारतVladimir Putinव्लादिमीर पुतिनNarendra Modiनरेंद्र मोदी