शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

काश्मीरप्रश्नी फ्रान्सची भारताला साथ, द्विपक्षीय चर्चेतून तोडगा काढण्याचा दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 9:16 AM

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा मुद्दा ठरलेल्या काश्मीर प्रश्नावर फ्रान्सने पुन्हा एकदा भारताला साथ दिली आहे.

चेन्टिली (फ्रान्स) - गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा मुद्दा ठरलेल्या काश्मीर प्रश्नावर फ्रान्सने पुन्हा एकदा भारताला साथ दिली आहे. काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय चर्चेतूनच सुटला पाहिजे. या भागात कुठल्याही तिसऱ्या  देशाने हस्तक्षेप करता कामा नये, असे वक्तव्य फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूल मॅक्रॉ यांनी केले आहे. सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूल मॅक्रॉ यांच्यात नुकतीच भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना मॅक्रॉ यांनी सांगितले की, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चेदरम्यान त्यांनी नुकत्याच जम्मू-काश्मीरबाबत भारताने घेतलेल्या निर्णयाची कल्पना दिली. तसेच हा प्रश्न भारताच्या सार्वभौमत्वाशी संबंधित असल्याचे सांगितले. त्यानंती मी त्यांना सांगितले की, काश्मीर प्रश्नाबाबत दोन्बी देशांनी चर्चेतून तोडगा काढला पाहिजे. या भागात कुठल्याही तिसऱ्या  देशाने हस्तक्षेप करता कामा नये. तसेच हिंसाचार होईल अशी पावले उचलता कामा नयेत.''दरम्यान, भारत आणि फ्रान्स यांच्यात झालेल्या राफेल विमान करारापैकी पहिले विमाने पुढील महिन्यात भारताला देण्यात येईल, असेही मॅक्रॉ यांनी यावेळी सांगितले. 

 मॅक्रॉ यांनी काश्मीरप्रश्नी भारताला साथ दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि फ्रान्स यांच्यातील मैत्री कुठल्याही स्वार्थावर आधारित नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, ''भारत आणि फ्रान्समधील मैत्री कुठल्याही स्वार्थावर आधारित नाही आहे. तर ती स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या सिद्धांतावर आधारलेली आहे. दोन्ही देश सातत्याने दहशतवादाचा सामना करत आहेत. त्यामुळे दहशतवादाविरोधातील सहकार्य व्यापक बनवण्याचा आमचा इरादा आहे.'' 

''त्याबरोबरत भारत आणि फ्रान्स जागतिक तापमानवाढ, पर्यावरण आणि तंत्रज्ञान समावेशक विकास यासंबंधीच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी एकत्रपणे सज्ज आहेत. आम्ही सर्वजण मिळून एक सुरक्षित आणि समृद्ध जगासाठी मार्ग खुला करू शकतो,'' असेही मोदींनी यावेळी सांगितले.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतFranceफ्रान्सNarendra Modiनरेंद्र मोदी