India Pakistan War : मागील काही दिवसापासून पाकिस्तान आणि भारतामध्ये तणाव सुरू आहे. दरम्यान, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानविरुद्धच्या लढाईत भारताला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. बीएलएने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये त्यांनी पाकिस्तानविरुद्धच्या लष्करी कारवाईत भारताचा लष्करी हात बनण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने सांगितले की, आम्ही भारताला आश्वासन देतो की जर त्यांनी दहशतवादी देश पाकिस्तानचा नाश करण्याचा अंतिम निर्णय घेतला तर आम्ही पश्चिम सीमेवरून हल्ला करण्यास तयार आहोत.
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
"जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर ते त्यांचे स्वागत करतील आणि भारतीय लष्करी शाखेला सहकार्य करेल, असंही त्यांनी सांगितले आहे.
बीएलएने पाकिस्तानविरुद्ध मोर्चा उघडला
बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. गेल्या ४८ तासांत त्यांनी बलुचिस्तानमधील ५१ ठिकाणी ७१ हून अधिक हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये, बीएलएने लष्करी तळ, तपासणी केंद्रे, गुप्तचर संस्था, खनिज वाहतूक वाहनांना लक्ष्य केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीएलएने या हल्ल्यांना 'ऑपरेशन हिरोफ' च्या तयारीसाठी आयोजित केलेल्या लष्करी सरावांचा भाग म्हणून वर्णन केले आहे. या हल्ल्यांचा उद्देश फक्त शत्रूला हानी पोहोचवणे नव्हता तर लष्करी समन्वय, जमिनीवरील नियंत्रण आणि बचावात्मक स्थितीची चाचणी घेणे देखील होते. जेणेकरून बीएलए भविष्यातील संघटित युद्धासाठी स्वतःला तयार करू शकेल.
'ऑपरेशन हेरोफ' काय आहे?
बीएलएने २०२४ मध्ये 'ऑपरेशन हिरोफ' सुरू केले. बीएलएने या ऑपरेशनचे वर्णन स्वतंत्र बलुचिस्तान राष्ट्र निर्माण करण्यासाठी एक बहुआयामी मोहीम म्हणून केले. बलुचिस्तानवरील पाकिस्तानच्या नियंत्रणाविरुद्ध दशकांपासून सुरू असलेल्या प्रतिकार मोहिमेचा एक भाग म्हणूनही त्यांनी त्याचे वर्णन केले.
ऑपरेशन हिरोफच्या पहिल्या टप्प्यात, बीएलएने १३० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याचा आणि प्रमुख महामार्ग आणि प्रतिष्ठानांवर ताबा मिळवल्याचा दावा केला. यामध्ये बेला येथील लष्करी तळावर २० तासांचा ताबाचा समावेश आहे.