पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानचा चेहरा जगासमोर आला. आता पाकिस्तानात वाढणाऱ्या लश्कर ए तोयबाच्या एका माजी दहशतवादाने अनेक काळे सत्य जगासमोर उघड केले आहे. लश्कराच्या संघटनेत असलेला नूर दाहरी याने हाफिज सईदचा कारनामा पहिल्यांदाच उघड केला आहे. लश्कर ए तोयबा दहशतवादी संघटनेमुळेच हजारो पाकिस्तानीचा मृत्यू झाला. त्याता हाफिज सईज जबाबदार असल्याचा आरोप त्याने केला. युवकांना मृत्यूच्या दाढेत ढकलण्याचं काम हाफिज सईदकडून केले जाते असंही नूर दाहरी याने म्हटलं आहे.
नूर दाहरीने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की, एकेकाळी माझी डॉक्टर बनण्याची इच्छा होती परंतु हाफिज सईदच्या नादी लागून लश्कर ए तोयबात सहभागी झालो आणि माझे भविष्य अंधारात ढकलले. माझ्या दिवंगत आईची इच्छा होती मी डॉक्टर बनावे तरीही हाफिज सईदच्या प्रभावाखाली मी आलो. विद्यापीठातील शिक्षण सोडले आणि लश्कर ए तोयबात सहभागी झालो. मला मुरीदके येथे हाफीजच्या सुरक्षेचे काम दिले होते. मुरीदके येथे दहशतवाद्यांचा आका आरामात राहायचा. मॉडिफाईड टोयोटो विगो कारमधून प्रवास करायचा. सईदच्या भाषणाने प्रभावित होऊन अनेक युवक लश्करात भरती झाले त्यानंतर काहींना अफगाणिस्तान आणि काहींना काश्मीरात पाठवण्यात आले असं त्याने म्हटलं.
दर गुरुवारी काय करतो?
दर गुरुवारी पाकिस्तानातील विविध भागात जात ५०० हून अधिक लोकांना अफगाणिस्तानातील कुनार प्रांतात असणाऱ्या ट्रेनिंग कॅम्पला पाठवले जाते. तिथून बरेचजण परत येत नाहीत. मी जेव्हा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानी काश्मीरात गेलो तेव्हा या संघटनेचा खरा चेहरा माझ्यासमोर आला. त्यानंतर मी लश्कर ए तोयबा सोडण्याचा निर्णय घेतला. जेव्हा मी लश्कर सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला गद्दार म्हणून संबोधण्यात आले. मला कायर म्हटलं असंही नूर दहारीने सांगितले.
१० लाख प्रशिक्षित दहशतवादी
लश्कर ए तोयबाकडे जवळपास १० लाख प्रशिक्षित दहशतवादी आहेत. आपला हेतू साध्य करण्यासाठी हाफिज सईद युवकांना मृत्यूच्या मार्गे नेतो. लश्कर ए तोयबा पाकिस्तानी सत्तेच्या इशाऱ्यावर एका 'राखेचे युद्ध' लढतोय ज्यामध्ये फक्त निष्पाप लोकच आपले प्राण गमावत आहेत. मला माझ्या आयुष्यात डोळ्यादेखत हाफिज सईदचा भयानक अंत पाहायचा आहे. आज अल्लाहने मला इस्लामच्या नावाखाली होणाऱ्या या फसवणुकीला उघड करण्यासाठी निवडले असंही नूर दाहरीने म्हटलं.
कोण आहे नूर दाहरी?
यूके-स्थित थिंक टँक इस्लामिक थिऑलॉजी ऑफ काउंटर टेररिझम (ITCT) चे संस्थापक आणि कार्यकारी संचालक असलेले नूर दाहरी याआधी लश्कर ए तोयबात दहशतवादी म्हणून कार्यरत होता. मात्र कालांतराने त्याने ही संघटना सोडली.