शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Lahore Blast: पाकिस्तानमध्ये अचानक सायरन वाजला! विमानतळाजवळ तीन मोठे स्फोट, लाहोरमध्ये घबराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 10:44 IST

Pakistan Lahore Blast News: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. यामध्ये पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ले केले.

India Pakistan War  ( Marathi News ) : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. यामध्ये पाकिस्तानमधील ( Pakistan ) ९ दहशतवादी तळांवर हल्ले केले. या ऑपरेशममुळे पाकिस्तान घाबरला आहे. दरम्यान, लाहोरमध्ये सतत स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत,सायरनही सतत वाजत आहेत. यामुळे लोक घराबाहेर पडले आहेत. परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी लाहोरमधील वॉल्टन रोडवर मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. लाहोरमधील वॉल्टर विमानतळाजवळील गोपाल नगर आणि नसीराबाद भागात स्फोट झाले. सायरन वाजल्यानंतर लोक घाबरून घराबाहेर पडले. आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट उठताना दिसले.

Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या

वॉल्टन विमानतळाजवळ ड्रोनचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. हा स्फोट ड्रोनमुळे झाला असावा. जामिंग सिस्टीममुळे ड्रोन पाडण्यात आल्याचे वृत्त आहे.

लाहोरमध्ये दोन स्फोट

लाहोरमधील अक्सारी ५ रोडजवळही दोन मोठे स्फोट ऐकू आल्याची माहिती स्थानिकांनी दिली. येथीव नेव्हल कॉलेजमधून धूर निघताना दिसत होता. दहशतवादाचा कणा मोडण्यासाठी भारतीय लष्कराने मंगळवारी रात्री उशिरा ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान ( Pakistan ) आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले.

भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या संयुक्त कारवाईअंतर्गत पाकिस्तान ( Pakistan ) आणि पीओकेमधील ज्या नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करण्यात आले त्यात बहावलपूर, मुरीदके, गुलपूर, भिंबर, चक अमरू, बाग, कोटली, सियालकोट आणि मुझफ्फराबाद यांचा समावेश आहे. बहावलपूरमधील बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय आणि मुदिरके येथील लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय लक्ष्य करण्यात आले.

जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद

'ऑपरेशन सिंदूर' नंतर, घाबरलेला पाकिस्तान ( Pakistan ) नियंत्रण रेषेवर सतत गोळीबार करत आहे. भारतीय लष्कर आणि हवाई दलाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे आणि देशातील सर्व हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय करण्यात आल्या आहेत. तसेच राजस्थानमधील जोधपूरसारख्या सीमावर्ती भागात, पुढील आदेश येईपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून सीमेवर सतत गोळीबार होत आहे. हे लक्षात घेऊन, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सीमावर्ती भागात सर्व हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय करण्यात आल्या आहेत. ( Ind ia Pakistan War  )

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतBlastस्फोटwarयुद्धAirportविमानतळViral Videoव्हायरल व्हिडिओ