भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्ष शुक्रवार-शनिवारच्या रात्री टोकाला पोहोचला. पाकिस्तानने सलग दुसऱ्या दिवशी अंधार होताच हवाई हल्ले करत नुकसान करण्याचे प्रयत्न केले. पण, भारतीय लष्कराने पाकिस्तानचे ड्रोन्स आणि मिसाईल्स हल्ले हवेतच निष्क्रिय केले. पाकिस्तानकडून भारतातील तब्बल २६ ठिकाणांना लक्ष्य केल्यानंतर भारतीय लष्कराने जशास तसे उत्तर दिले. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानने शक्तिशाली फतेह १ मिसाईल डागल्यानंतर भारताने बॅलेस्टिक मिसाईल्सने उत्तर दिले. यामुळे पाकिस्तानातील अनेक ठिकाणी मोठंमोठे स्फोट झाले. पाकिस्तानकडून असा दावा करण्यात आला आहे.
पाकिस्तानकडून ८-९ मेच्या रात्री ड्रोन्स आणि मिसाईल्स डागण्यात आल्या. पाकिस्तानचे हे हल्ले पूर्णपणे हाणून पाडण्यात आले. त्यामुळे पाकिस्तान पिसाळला. ९ आणि १० मे रोजीच्या रात्री पाकिस्तानकडून तब्बल चार राज्यातील २६ ठिकाणी हल्ल्याचे प्रयत्न झाले.
रात्रभर अनेक ठिकाणी ड्रोन्स, मिसाईल्स डागले गेले. हे भारतीय लष्कराने निष्क्रिय केले. त्यानंतर पहाटे पाकिस्तानकडून फतेह १ मिसाईल डागण्यात आली. ही मिसाईल भारतीय लष्कराने पाडली. हरयाणात ही मिसाईल पडल्यानंतर प्रचंड मोठा स्फोट झाला, अशी माहिती आहे.
व्हिडीओ बघा
भारताचे प्रत्युत्तर, पाकिस्तानमध्ये प्रचंड मोठ स्फोट
पाकिस्तानकडून सातत्याने हवाई हल्ले करण्यात आल्यानंतर भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरनुसार काही ठिकाणी बॅलेस्टिक मिसाईल डागल्या.
दोन्ही देशात घमासान लष्करी संघर्ष सुरू असतानाच पाकिस्तानातील महत्त्वाच्या शहरांमध्ये मोठे स्फोट झाले आहे. याचे व्हिडीओ समोर आले आहेत.
भारतीय लष्कराने पाकिस्तानी लष्कराच्या ठिकाणांवर ६ बॅलेस्टिक मिसाईल्स डागल्याचे दावा पाकिस्तानने केला आहे. या मिसाईल्समुळे पाकिस्तानातील रावळपिंडी, मुरीद चक्रवाल, सोरकोट आणि नूरखान या हवाई तळांजवळ मोठे स्फोट झाले आहेत.