शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 20:06 IST

India Pakistan Tension: भारत आपल्यावर कधीही हल्ला करू शकतो, या भीतीने पाकिस्तान घाबरला आहे.

Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट आहे. सामान्य लोकांपासून ते राजकारण्यांपर्यंत, सर्वजण पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करत आहेत. संपूर्ण देश एकसुरात पाकिस्तानात घुसून हल्ला करण्याची आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) भारतात परत आणण्याची मागणी करत आहे.

दोन महिन्यांचा रेशनचा साठा करण्याचे निर्देश दरम्यान, भारत सरकारने घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे पाकिस्तान घाबरला आहे. भारत आपल्यावर कधीही हल्ला करू शकतो, या भीतीने पाक सरकारने पाकव्याप्त काश्मीरमधील सीमेजवळ राहणाऱ्या लोकांना दोन महिन्यांचे राशन साठवण्याचे आवाहन केले आहे. वृत्तसंस्था एएफपीच्या वृत्तानुसार, पीओकेचे पंतप्रधान चौधरी अन्वरुल हक यांनी विधानसभेत सांगितले की, 13 मतदारसंघांमध्ये दोन महिन्यांसाठी अन्नसाठा साठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

1 अब्ज रुपयांचा आपत्कालीन निधी तयार या 13 मतदारसंघांमध्ये अन्न, औषधे आणि इतर सर्व मूलभूत गरजा पुरवण्यासाठी 1 अब्ज रुपयांचा आपत्कालीन निधी देखील तयार करण्यात आला आहे. नियंत्रण रेषेवरील भागातील रस्त्यांच्या देखभालीसाठी सरकारी आणि खाजगी यंत्रणा देखील तैनात केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

भारताच्या कारवाईने पाकिस्तान घाबरला पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी अलीकडेच म्हटले की, भारत हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे विश्वसनीय पुरावे त्यांच्याकडे आहेत. या भीतीमुळे पीओकेमधील पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी गुरुवारी 10 दिवसांसाठी 1000 हून अधिक धार्मिक शाळा बंद ठेवल्या आहेत.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारतwarयुद्ध