शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेबाबत चर्चा करण्यास तयार - पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 14:42 IST

 पाकिस्तानी लढाऊ विमानांनी केलेला हल्ला परतवून लावताना विमान कोसळून पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेबाबत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने मोठे विधान केले आहे.

इस्लामाबाद -  पाकिस्तानी लढाऊ विमानांनी केलेला हल्ला परतवून लावताना विमान कोसळून पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेबाबत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने मोठे विधान केले आहे. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेबाबत भारतासी चर्चा करण्यास तयार असल्याचे वक्तव्य पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. याबाबत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी य.यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेबाबत वाटाघाटी करण्यासाठी चर्चा करण्यास पाकिस्तान तयार आहे.'' बुधवारी भारतीय हद्दीत घुसून हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई दलाने चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यावेळी पळ काढणाऱ्या विमानाचा पाठलाग करताना भारताचे मिग-२१ लढाऊ विमान बुधवारी (ता. २७) कोसळले. तत्पूर्वी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पॅराशूटच्या साहाय्याने बाहेर पडण्यात यशस्वी झाले होते. जखमी अवस्थेतील वर्धमान यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले. त्यानंतर भारताने आपला एक वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात असून, जिनिव्हा करारामधील तरतुदींनुसार त्याची सुटका करण्यात यावी, अशी मागणी केली होती. 

जिनिव्हा करार काय आहे?या आंतरराष्ट्रीय करारानुसार शत्रू राष्ट्राच्या ताब्यात आलेले सैनिक अथवा नागरिकांना यातना देणे, शारीरिक इजा पोहोचविणे, मानवाधिकार नाकारणे आदींना प्रतिबंध घालण्यात आला आहे. भारतीय वैमानिक ताब्यात घेतल्याचे स्वत: पाकिस्ताननेच उघड केले आहे. तो जिवंत आहे आणि त्याची शारीरिक अवस्थाही चांगली असल्याचे जगासमोर आले आहे. त्यामुळे वर्धमान याच्यासोबत पाकिस्तानला आगळीक करता येणार नाही. जिनिव्हा कराराचा भंग केल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची प्रतिमा आणखी काळवंडेल, जे त्यांना अजिबात परवडणारे नाही.

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तानIndiaभारतindian air forceभारतीय हवाई दलAbhinandan Varthamanअभिनंदन वर्धमान