India Pakistan Tension: ऑपरेशन सिंदूरनंतरभारतानेपाकिस्तानविरुद्ध आणखी एका मोठ्या कारवाईची तयारी केली आहे. पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकण्यासाठी भारत फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) शी चर्चा करू शकतो. एफएटीएफ एक जागतिक संघटना असून, तिचे काम मनी लाँड्रिंग आणि दहशतवादासाठी आर्थिक मदतीवर लक्ष ठेवणे आहे.
पाकिस्तान हा दहशतवादाचा बालेकिल्ला आहे, गेल्या अनेक वर्षांपासून दहशतवाद्यांना निधी पुरवतो. त्यामुळेच त्याला अनेक वेळा ग्रे लिस्टमध्ये टाकण्यात आले आहे. दहशतवादी निधीसाठी जून 2018 मध्ये FATF ने पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकले होते, परंतु ऑक्टोबर 2022 मध्ये ते ग्रे लिस्टमधून बाहेर काढले. त्यापूर्वी 2008, 2012 आण 2015 मध्येही पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकले होते.
भारत जागतिक बँकेशीही बोलू शकतोभारत जागतिक बँकेकडून पाकिस्तानला मिळणाऱ्या निधीलाही विरोध करू शकतो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने अलीकडेच पाकिस्तानला 1 अब्ज डॉलर्सचा निधी देण्यास मान्यता दिली आहे. भारताने यालाही कडाडून विरोध केला आहे.
गेल्या महिन्यात 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून 26 पर्यटकांना मारले होते. त्या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे बिघडले आहेत. आता पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यासाठी भारताने आपले शिष्टमंडळ तयार केले असून, ते विविध देशांमध्ये जाऊन पाकिस्तानची पोलखोल करणार आहेत. याशिवाय, पाकिस्तानला विविध जागतिक संघटनांकडून मिळणारी मदतही थांबवण्याचे प्रयत्न करत आहे.