शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 12:06 IST

इंस्ताबुलमध्ये आयोजित या इस्लामिक देशांच्या बैठकीत सिंधू जल करारासोबतच काश्मीर मुद्द्यावरही इतर देशांनी पाकिस्तानच्या सूरात सूर मिसळले

इस्लामाबाद - इस्लामी सहकार्य संघटना(OIC) च्या परराष्ट्र मंत्र्‍यांच्या परिषदेत भारताने पाकसोबतचा सिंधू जल करार पूर्ववत करण्याच्या मागणीवर जोर दिला. ५७ इस्लामिक देशांच्या या संघटनेची बैठक रविवारी तुर्कीच्या इंस्ताबुलमध्ये पार पडली. त्यात सिंधू जल करारासह पाकिस्तान-भारत यांच्यातील द्विपक्षीय कराराचे पालन करावे असं आवाहन दोन्ही देशांना केले. OIC संघटनेचा हा आग्रह पूर्णपणे पाकिस्तानच्या समर्थनार्थ असल्याचे दिसून आले. 

सीएफएमकडून जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की, दक्षिण आशियात अलीकडच्या काळात झालेल्या सैन्य कारवाईवर आम्हाला चिंता आहे. यात भारताने पाकिस्तानात अनेक ठिकाणी हल्ले केले. आम्ही दोन्ही देशांना संयम बाळगून आक्रमक भूमिका न घेण्याचं आवाहन करतो. त्याशिवाय सिंधू जल करार रोखला जाऊ नये. आधीसारखे या दोन्ही देशांनी कराराचे पालन करावे असं त्यांनी सांगितले. 

पाकिस्तानच्या सूरात सूर

इंस्ताबुलमध्ये आयोजित या इस्लामिक देशांच्या बैठकीत सिंधू जल करारासोबतच काश्मीर मुद्द्यावरही इतर देशांनी पाकिस्तानच्या सूरात सूर मिसळले. आम्ही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, OIC प्रस्ताव आणि काश्मिरी लोकांच्या इच्छेनुसार त्यांच्या मानवाधिकाराचे पूर्णपणे समर्थन व्यक्त करतो असं सीएफएमने सांगितले. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार या बैठकीत सहभागी होण्यासाठी तुर्कीला गेले होते. डार यांच्यासोबत पाकिस्तानी सैन्याचे फिल्ड मार्शल असीम मुनीरही तुर्कीत होते. मुनीर यांनी तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप एर्दोगन यांची भेट घेतली. या बैठकीचा परिणाम बैठकीनंतर करण्यात आलेल्या विधानावरून दिसून आला.

सिंधू जल करार काय आहे?

सिंधू जल करारावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९६० स्वाक्षरी झाली होती. या करारानुसार भारत आणि पाकिस्तानात नद्यांच्या पाण्याचे वाटप झाले. भारताने २२ एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू जल कराराला स्थगिती देत पाकिस्तानला मोठा झटका दिला. भारताच्या या कठोर निर्णयामुळे बिथरलेल्या पाकिस्तानी नेत्यांनी भारताला थेट युद्धाचीही धमकी दिली. या मुद्द्यावर मागील काही महिन्यांपासून दोन्ही देशात तणाव वाढला आहे. त्यावर इस्लामिक देशांची संघटना OIC यांनी एन्ट्री घेतली आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतIslamic Stateइस्लामिक स्टेटOperation Sindoorऑपरेशन सिंदूर