शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 14:36 IST

India-Mauritius Relation: हिंदी महासागरात वर्चस्व वाढवण्यासाठी भारत सरकार आपली सागरी धोरणे अधिक मजबूत करत आहे.

India-Mauritius Relation:भारतापासून ५१०० किमी अंतर, फक्त १२ लाख लोकसंख्येचा देश, त्यापैकी ४८ टक्के लोक हिंदू धर्मीय, हिंद महासागर क्षेत्रात भारताच्या धोरणात्मक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा भागीदार...आम्ही ज्या देशाबद्दल बोलत आहोत, तो मॉरिशस आहे. केंद्रातील मोदी सरकार या लहान देशावर विशेष लक्ष देत आहे. पंतप्रधान मोदी स्वतः भारत आणि मॉरिशसमधील संबंध अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

पंतप्रधान मोदीं मंगळवारी मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांच्याशी संवाद साधला आणि भारत-मॉरिशस संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला. मॉरिशससोबतचे संबंध भारताच्या व्हिजन ओशन पॉलिसीचा एक महत्त्वाचा भाग असून, यामुळे हिंद महासागर क्षेत्रात भारताचा प्रभाव वाढतो. कोव्हिड काळासह भारताने अडचणींच्या काळात अनेकदा मॉरिशसला मदत केली आहे. दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधही मजबूत होत आहेत.

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X द्वारे सांगितले की, "माझे मित्र पंतप्रधान डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांच्याशी बोलून मला आनंद झाला. भारत-मॉरिशस धोरणात्मक भागीदारी आणि प्रादेशिक विकास अधिक मजबूत करण्याबाबत आम्ही विचारांची देवाणघेवाण केली. भारताच्या 'व्हिजन ओशन' आणि आमच्या नेबरहूड फर्स्ट धोरणात मॉरिशस हा एक महत्त्वाचा भागीदार आहे.

पंतप्रधान मोदींचा मॉरिशस दौरापंतप्रधान मोदींनी पंतप्रधान रामगुलाम यांना लवकरच भारत भेटीचे आमंत्रण दिले आहे. मार्चच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या मॉरिशसला गेले होते. पंतप्रधान मोदींना दुसऱ्यांदा मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या समारंभाचा भाग म्हणून, मॉरिशसचे अध्यक्ष धरमबीर गोखूल यांनी पंतप्रधान मोदींना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला. एखाद्या भारतीय नेत्याला हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्याची ही पहिलीच वेळ होती.

भारताने आखली रणनीतीअसे म्हटले जाते की, जो महासागरांवर नियंत्रण ठेवतो तोच जग चालवतो. जागतिक व्यापार, ऊर्जा आणि लष्करी रणनीतीसाठी हिंदी महासागर महत्त्वाचा आहे. हे लक्षात घेऊन, भारत या प्रदेशावरील आपले वर्चस्व वाढवण्यासाठी आपली सागरी धोरणे सतत मजबूत करत आहे. गेल्या दशकात भारताने आपली सागरी रणनीती बदलली आहे. इंडो-पॅसिफिक आणि हिंद महासागर प्रदेशात चीनच्या प्रभावाला तोंड देण्यासाठी भारत रणनीती आखत आहे.

मॉरिशस हा व्हिजन ओशनचा एक महत्त्वाचा भाग महासागरा धोरणांमुळे मॉरिशससारख्या लहान बेट देशांसोबत भारताची भागीदारी मजबूत होत आहे. आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे सागरी सुरक्षा मजबूत करणे. भारतीय नौदलाचे वाढलेले सराव, माहितीची देवाणघेवाण, संरक्षण सहकार्य आणि हिंदी महासागरावरील देखरेख चाचेगिरी, बेकायदेशीर मासेमारी, लष्करी विस्तार आणि इतर धोक्यांपासून संरक्षण करते. व्हिजन ओशन भारताची प्रादेशिक सुरक्षा भूमिका मजबूत करते आणि समुद्रात आपली उपस्थिती धोरणात्मकरित्या वाढवते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतSea Routeसागरी महामार्गBJPभाजपाchinaचीन