जागतिक राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असतानाच, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यात टेलिफोनवरून महत्त्वपूर्ण चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या असून, भारत-इस्रायल धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर भर दिला. विशेष म्हणजे, व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेच्या लष्करी कारवाईमुळे निर्माण झालेल्या जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी आणि नेतान्याहू यांच्यात चर्चा झाली.
दोन्ही नेत्यांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध केला. दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलरेन्स धोरण राबवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. सामायिक लोकशाही मूल्ये आणि परस्पर विश्वासावर आधारित असलेली ही धोरणात्मक भागीदारी येत्या वर्षात नव्या उंचीवर नेण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले.
या संवादादरम्यान पंतप्रधान नेतान्याहू यांनी गाझा शांतता योजनेच्या अंमलबजावणीबाबत पंतप्रधान मोदींना सविस्तर माहिती दिली. यावर प्रतिक्रिया देताना, "गाझा प्रदेशात न्याय्य आणि कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताचा नेहमीच पाठिंबा असेल," असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले. पश्चिम आशियातील प्रादेशिक परिस्थितीवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर विचारांची देवाणघेवाण केली.
पंतप्रधान मोदींचे ट्विट
नेतान्याहू यांच्याशी झालेल्या संवादानंतर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती दिली. मोदी म्हणाले की, "माझे मित्र, पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी बोलणे आणि त्यांना व इस्रायलच्या जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणे हा आनंददायी अनुभव होता. आम्ही भारत-इस्रायल भागीदारी मजबूत करण्यावर आणि दहशतवादाविरुद्ध अधिक जोमाने लढण्याच्या सामायिक संकल्पावर चर्चा केली."
जागतिक उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर चर्चा
व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेच्या लष्करी कारवाईने राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीला ओलीस ठेवल्याची घटना घडली. या घटनेने जागतिक राजकारणात मोठी उलथापालथ झाली असतानाच, आशिया आणि युरोपला जोडणाऱ्या या दोन महत्त्वाच्या देशांच्या प्रमुखांनी केलेली चर्चा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
Web Summary : Modi and Netanyahu discussed strengthening India-Israel ties, condemning terrorism. They aim for enhanced strategic partnership based on shared values. Modi assured support for peace in Gaza, exchanging views on regional issues amidst global tensions.
Web Summary : मोदी और नेतन्याहू ने भारत-इज़राइल संबंधों को मजबूत करने और आतंकवाद की निंदा करने पर चर्चा की। उनका लक्ष्य साझा मूल्यों के आधार पर बढ़ी हुई रणनीतिक साझेदारी है। मोदी ने गाजा में शांति के लिए समर्थन का आश्वासन दिया।