आगामी वर्षांत भारतइस्रायलच्या विकासात एक मोठी भूमिका पार पाडू शकतो, असे इस्रायलचेभारतीतील राजदूत रियूवेन अजार यांनी म्हटले आहे. याच वेळी त्यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाजा संकट समाधानासंदर्भात मांडलेल्या शांतता योजनेला पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अजार म्हणाले, “कालचा दिवस एक ऐतिहासिक दिवस होता. अमेरिका, इजरायल, अरब देश, मुस्लीम राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय समुदायासह पंतप्रधान मोदी यांनीही या शांती योजनेला पाठिंबा दिला.”
भारतासाठी मोठी संधी -अजार म्हणाले, "इस्रायल पुढील 10 वर्षांत 200 अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षाही अधिक किमतीच्या निविदा जारी करणार आहे. यात भारतीय कंपन्यांसाठी मोठी संधी आहे. नुकतेच, इजरायलचे एक शिष्टमंडळ भारतात आले होते, ज्यांनी भारतीय पायाभूत सुविधा (इंफ्रास्ट्रक्चर) कंपन्यांना इजरायलमधील बांधकाम प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. गाजाच्या पुननिर्मितीत भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. भारताकडे प्रचंड क्षमता आहे. हे पूर्णपणे भारतावर अवलंबून आहे. भारत हा जगातील एक नवीन निर्माता आहे.”
शांती योजनेतून नवा मार्ग प्रश्सत होईल - शांती योजना यशस्वी झाल्यास भारताला अमेरिका, टोनी ब्लेअर आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटनांसोबत काम करण्याची संधी मिळेल, असेही अजार यांनी म्हटले आहे. यामुळे भारताला नव्या संधी उपलब्ध होतील. भारत आणि इजरायलमधील समान मूल्यांवर जोर देत अजार म्हणाले, “आम्ही दहशतवादाला विरोध करतो आणि कट्टरपंथी विचारांचा सामना करतो. विकास आणि शांततेच्या दिशेने जाणाऱ्या प्रयत्नांना पाठिंबा देतो. हीच मूल्ये भारत आणि इजरायलला एकत्र आणतात.”
Web Summary : Israel sees India playing a key role in Gaza's reconstruction, offering significant opportunities for Indian infrastructure companies. A $200 billion tender is expected. India's support for peace efforts aligns with shared values against terrorism.
Web Summary : इजरायल गाजा के पुनर्निर्माण में भारत को एक महत्वपूर्ण भूमिका निभाते हुए देखता है, जो भारतीय बुनियादी ढांचा कंपनियों के लिए महत्वपूर्ण अवसर प्रदान करता है। 200 बिलियन डॉलर का टेंडर अपेक्षित है। शांति प्रयासों के लिए भारत का समर्थन आतंकवाद के खिलाफ साझा मूल्यों के साथ संरेखित है।