शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा 'खास मित्र' इम्रान खान यांच्या मदतीला; पाकिस्तानसाठी उघडला खजिना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 14:09 IST

वायू निर्यात करण्यासाठी पाकिस्तानमधील कराचीपर्यंत पाईप लाईन टाकणार; २.२५ अब्ज डॉलरचा खर्च येणार

इस्‍लामाबाद: भारताचा पारंपारिक शत्रू असलेल्या पाकिस्तानला चीनकडून कायम मदत दिली जाते. भारताला शह देण्यासाठी, भारताच्या अडचणी वाढवण्यासाठी चीन पाकिस्तानला सातत्यानं मदत करतो. मात्र आता भारताचा जुना आणि खास मित्र मानल्या जाणाऱ्या रशियानं पाकिस्तानसाठी खजिना उघडला आहे. रशियातील कासूर ते पाकिस्तानमधील कराचीपर्यंत एक पाईपलाईन टाकली जाणार आहे. यासाठीच्या करारावर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्वाक्षरी केली आहे.चीननं दाखवला पाकिस्तानला ठेंगा; इम्रान खान यांना कर्ज माफीसाठी जोडावे लागले हातपाकिस्तान आणि रशियामधील प्रकल्प दोन देशांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन कराचीमध्ये येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. तशी चर्चा पाकिस्तानात सुरू आहे. या वायू वाहिनीचं नाव आधी उत्तर-दक्षिण वायूवाहिनी असं होतं. आता त्याला पाकिस्तान वाफ वायू वाहिनी असं नाव देण्यात आलं आहे. शीतयुद्ध काळात चीन आणि रशियामधील संबंध ताणले गेले होते. मात्र त्यावेळी निर्माण झालेली कटुता कमी करून संबंध सुधारण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे. रशिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये वायू वाहिनीसाठी कराराला २०१५ मध्येच मूर्त स्वरुप मिळालं होतं. मात्र रशियन कंपन्यांवर अमेरिकेनं निर्बंध लादल्यानं वायू वाहिनीचं काम बारगळलं. पाकिस्तान वाफ वायू वाहिनीची लांबी ११२२ किलोमीटर असणार आहे.दोन्ही देशांनी मिळून प्रकल्पातील अडथळे दूर करून नवा करार केला आहे. यानुसार वायू वाहिनीत ७४ टक्के हिस्सा पाकिस्तानचा असेल. याआधी संपूर्ण वाहिनीचं काम रशिया करणार होता. त्यासाठी २.२५ अब्ज डॉलरचा खर्च येणार आहे. वायू वाहिनीचं काम पूर्ण झाल्यानंतर रशियातून पाकिस्तानला वायूची निर्यात केली जाईल.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानVladimir Putinव्लादिमीर पुतिनImran Khanइम्रान खानrussiaरशिया