शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा प्रभाव वाढला; भारताने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 23:07 IST

तालिबानने उत्तर अफगाणिस्तानमधील अनेक जिल्हे ताब्यात घेतले आहेत. यामुळे अनेक देशांच्या चिंतेत भर पडली आहे.

काबूल: अमेरिकेच्या फौजांनी माघार घेण्यास सुरुवात केल्यानंतर आता अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा तालिबान अधिक आक्रमक होत आहे. तालिबानने उत्तर अफगाणिस्तानमधील अनेक जिल्हे ताब्यात घेतले आहेत. यामुळे अनेक देशांच्या चिंतेत भर पडली आहे. यातच आता भारताने मोठा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती मिळाली आहे. (india evacuate nationals and officials from afghanistan taliban territories)

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांच्या वाढत्या प्रभावामुळे भारतही चिंतेत असल्याचे सांगितले जात आहे. एका वृत्तवाहिनीला मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानात तैनात असलेले भारतीय अधिकारी व नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तालिबान्यांनी अफगाणिस्तानातील बर्‍याच भागांचा ताबा घेतल्याने सुरक्षा परिस्थिती वेगाने ढासळत आहे. त्यामुळे आपल्या अधिकारी आणि नागरिकांच्या सुरक्षितेला प्राधान्य देत भारत सरकार त्यांना अफगाणिस्तानबाहेर काढणार आहे.

आता पश्चिम बंगालमध्ये साजरा होणार ‘खेला होबे दिवस’; ममता बॅनर्जींनी केली घोषणा

भारतीयांना बाहेर काढण्याची योजना तयार

भारताने काबूल, कंधार आणि मझार शरीफ येथे असलेले आपले कर्मचारी आणि इतर भारतीयांना अफगाणिस्तान बाहेर काढण्याची योजना भारताने तयार केली आहे. अफगाणिस्तानातील शहरे व ग्रामीण, दुर्गम भागातील सुरक्षा परिस्थिती गंभीर होतेय. यामुळे दूतावासांचे कामकाज अवघड होत चालले आहे. अफगाण अधिकारी स्वतःच तालिबान हल्ल्याच्या भीतीने सरकारच्या नियंत्रणातील प्रदेशातून पळ काढत आहेत, असे सांगितले जात आहे. 

अनिल अंबानींना मोठा धक्का! ‘या’ कंपनीच्या परवाना नुतनीकरणाला केंद्राचा नकार

भारताचे चार वाणिज्य दूतावास

अफगाणिस्तानमध्ये भारताचे चार वाणिज्य दूतावास होते. हे दूतावास काबूल येथील दूतावासाच्या संपर्कात होते. अफगाणिस्तानमधून भारतीय दूतावासातील सर्वच कर्मचाऱ्यांना भारतात पुन्हा आणणार की, काही कर्मचारी तेथेच राहणार, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. जगातील काही देशांनी तालिबानसोबत चर्चा सुरू केली आहे. तर, भारतीय अधिकाऱ्यांनीही तालिबान नेत्यांची भेट घेतली असल्याचा दावा कतारच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

दरम्यान, एप्रिल महिन्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर नाटोनेही आपले सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत तालिबानने बर्‍याच ठिकाणांचा ताबा घेतला आहे. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीयS. Jaishankarएस. जयशंकर