Lokmat Money > बिझनेस न्यूज > Anil Ambani: अनिल अंबानींना मोठा धक्का! ‘या’ कंपनीच्या परवाना नुतनीकरणाला केंद्राचा नकार

Anil Ambani: अनिल अंबानींना मोठा धक्का! ‘या’ कंपनीच्या परवाना नुतनीकरणाला केंद्राचा नकार

Anil Ambani: आता अनिल अंबानी यांच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याचे संकेत असल्याचे सांगितले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 08:36 PM2021-07-06T20:36:07+5:302021-07-06T20:37:04+5:30

Anil Ambani: आता अनिल अंबानी यांच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याचे संकेत असल्याचे सांगितले जात आहे.

department of telecommunications refused to renew licence of anil ambani rcom company | Anil Ambani: अनिल अंबानींना मोठा धक्का! ‘या’ कंपनीच्या परवाना नुतनीकरणाला केंद्राचा नकार

Anil Ambani: अनिल अंबानींना मोठा धक्का! ‘या’ कंपनीच्या परवाना नुतनीकरणाला केंद्राचा नकार

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून उद्योजक अनिल अंबानी (anil ambani) यांचा पाय अधिकाधिक खोलात जात असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच आर्थिक संकटात सापडल्यामुळे अनिल अंबानी त्यांच्यापुढे दररोज नवनवीन समस्या उभ्या राहत आहेत. त्यातच आता अनिल अंबानी यांच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याचे संकेत असल्याचे सांगितले जात आहे. कारण अनिल अंबानी यांच्या एका कंपनीच्या परवाना नुतनीकरणाला केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने स्पष्ट नकार दिला आहे. (department of telecommunications refused to renew licence of anil ambani rcom company)  

अनिल अंबानी यांची एकेकाळी दूरसंचार सेवेतील आघाडीची कंपनी असलेली रिलायन्स कम्युनिकेशन दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. याच कंपनीच्या परवाना नुतनीकरणासाठी दूरसंचार मंत्रालयाने नकार दिल्याचे सांगितले जात आहे. रिलायन्स कम्युनिकेशन कंपनी संपूर्ण थकबाकी अदा करत नाही, तोपर्यंत परवान्याचे नुतनीकरण होणार नाही, असे दूरसंचार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. 

घरटी उत्पन्न सरासरी ७५ टक्क्यांनी घटलं; ग्रामीण भारत कर्जाच्या गर्तेत!

रिलायन्स कम्युनिकेशन्सला मालमत्ता गमवावी लागेल

रिलायन्स कम्युनिकेशन्सचे तब्बल २६ हजार कोटी रुपयांचे देणे बाकी आहे. कंपनीकडून थकबाकी अदा करण्यात आली नाही, तर रिलायन्स कम्युनिकेशनला त्यांच्याकडील स्पेक्ट्रमवरील हक्कही सोडून द्यावा लागू शकतो. तसेच रिलायन्स कम्युनिकेशन्सला मालमत्ताही गमवावी लागू शकते, असे सांगितले जात आहे. याशिवाय, कंपनीच्या दिवाळखोरी प्रक्रियाही ठप्प होऊन अनिल अंबानींना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. रिलायन्स कम्युनिकेशनकडे सध्या देशातील २२ सर्कल्समधील स्पेक्ट्रम आहेत. यापैकी १४ स्पेक्ट्रम ८५० मेगाहर्टझचे आहेत.

दरम्यान, रिलायन्स कम्युनिकेशन दिवाळखोरीत गेली, तर किमान ४० हजार कोटींच्या कर्जावर पाणी सोडावे लागेल या भीतीने सध्या बँकांचा जीव टांगणीला लागला आहे. ३८ बँकांनी रिलायन्स कम्युनिकेशनला ४० हजार कोटीचे कर्ज दिले आहे. एसबीआयने ३ हजार कोटींचे कर्ज दिले असून, एलआयसीचे ३ हजार ७०० कोटी रिलायन्स कम्युनिकेशनने थकवले आहेत, असे सांगितले जात आहे. 
 

Web Title: department of telecommunications refused to renew licence of anil ambani rcom company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.