शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
2
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
3
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
4
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
5
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
6
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
7
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
8
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
9
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
10
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
13
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
14
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
15
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
16
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
17
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
18
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
19
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
20
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
Daily Top 2Weekly Top 5

Mother of All Deals म्हणजे काय? भारत-युरोप करारातून कोणाला काय फायदा? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 17:27 IST

What Is Mother of All Deals: भारत आणि युरोपमधील एका महत्त्वाकांक्षी कराराच्या घोषणेने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

What Is Mother of All Deals: स्वित्झर्लंडमधील दावोस येथे World Economic Forum (WEF) चे आयोजन करण्यात आले आहे. या यात जगभरातील अनेक देशांचे नेते आणि उद्योगपती सहभागी होत आहेत. याच पार्श्वभूमीवर, भारत आणि युरोपमधील एका महत्त्वाकांक्षी कराराच्या घोषणेने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. हा करार केवळ एक साधा व्यापार करार नसून, त्याला ‘मदर ऑफ ऑल डील्स’ असे संबोधले जात आहे. जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता आणि भारतासमोरील आर्थिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर हा करार दोन्ही खंडांसाठी काय बदल घडवू शकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दावोसमध्ये ऐतिहासिक घोषणा

दावोस येथे सुरू असलेल्या WEF मध्ये युरोपियन आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी भारत आणि EU यांच्यातील मुक्त व्यापार करार (FTA) अंतिम टप्प्यात असल्याची ऐतिहासिक घोषणा केली. हा करार 27 जानेवारीला, म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी औपचारिकरित्या स्वाक्षरीसाठी पुढे येण्याची शक्यता आहे. हा करार केवळ व्यापारापुरता मर्यादित नसून, रणनीतिक सहकार्य, गुंतवणूक आणि जागतिक आर्थिक संतुलनाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

‘मदर ऑफ ऑल डील्स’ म्हणजे काय?

भारत-युरोप मुक्त व्यापार कराराला ‘मदर ऑफ ऑल डील्स’ असे संबोधले जाण्याचे कारण म्हणजे, हा करार २ अब्जांहून अधिक लोकसंख्येच्या बाजारपेठेला जोडतो. जागतिक GDP च्या जवळपास २५ टक्के वाट्याचा यात समावेश आहे. या करारामुळे भारतातील संरक्षण, तंत्रज्ञान, फार्मास्युटिकल्स, आयटी, कृषी अशा प्रमुख क्षेत्रांना मोठी चालना मिळेल. युरोपला या माध्यमातून ‘फर्स्ट मूव्हर अ‍ॅडव्हान्टेज’ मिळणार असून, भारतीय बाजारात लवकर प्रवेश करण्याची संधी मिळणार आहे. भारताचे वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि युरोपियन नेतृत्वाने या कराराला आर्थिक व रणनीतिक दृष्टिकोनातून निर्णायक पाऊल म्हटले आहे.

भारताला काय फायदे?

या कराराचा सर्वाधिक फायदा भारतीय उद्योगांना होणार आहे. युरोपियन बाजार खुला झाल्यामुळे कापड, पादत्राणे, रत्न व दागिने यांच्या निर्यातीला चालना, लघु व मध्यम उद्योगांमध्ये रोजगारनिर्मिती, संरक्षण, तंत्रज्ञान उत्पादन आणि सेवा क्षेत्राला नवी दिशा मिळेल. तज्ज्ञांच्या मते, हा करार भारताला जागतिक उत्पादन व सेवा केंद्र म्हणून अधिक बळकट करू शकतो.

युरोपला काय मिळणार?

युरोपसाठी हा करार भारतीय बाजारात थेट प्रवेशाचा मार्ग मोकळा करतो. ऑटोमोबाईल, पेय पदार्थ, तांत्रिक उपकरणे यांसाठी भारत मोठी बाजारपेठ आहे. हा करार गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक स्थैर्यासाठी युरोपसाठीही फायदेशीर ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम

या कराराचा प्रभाव भारत आणि युरोपपुरताच मर्यादित राहणार नाही. अमेरिका व इतर भागांतील आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारत-युरोप एक स्थिर आर्थिक भागीदारी म्हणून पुढे येतील. जागतिक व्यापार धोरणे, पुरवठा साखळी आणि गुंतवणूक निर्णयांवर परिणाम होईल. गुंतवणूकदारांसाठी हा करार एक स्पष्ट संकेत आहे की, भारत आणि युरोप भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी एकत्रित रणनीती आखत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : India-Europe 'Mother of All Deals': Benefits for Both Explained

Web Summary : The India-EU free trade agreement, dubbed 'Mother of All Deals,' promises significant benefits for both regions. India gains access to European markets, boosting exports and creating jobs. Europe secures a foothold in India's large market, fostering investment and stability.
टॅग्स :IndiaभारतSwitzerlandस्वित्झर्लंडbusinessव्यवसायInvestmentगुंतवणूक