शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
5
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
6
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
7
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
8
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
9
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
10
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
11
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
12
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
13
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
14
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
15
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
16
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
17
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
18
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
19
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
20
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव

डोकलाम प्रकरणी चीनला नव्हती भारताकडून आक्रमकतेची अपेक्षा

By admin | Published: July 14, 2017 7:09 PM

डोकलाममध्ये भारतीय लष्कराने चीनी सैन्याच्या आक्रमक हालचालींना पायबंद घातल्याने निर्माण झालेली तणावाची परिस्थिती

ऑनलाइन लोकमत
ब्रुसेल्स, दि. १४ -  डोकलाममध्ये भारतीय लष्कराने चीनी सैन्याच्या आक्रमक हालचालींना पायबंद घातल्याने निर्माण झालेली तणावाची परिस्थिती अद्याप कायम आहे. नेहमीप्रमाणे आक्रमक भूमिका घेत भूतानच्या सीमेवरील डोकलाममध्ये रस्त्याचे बांधकाम सुरू केल्यावर भारताकडून फारसा विरोध होणार नाही, असे चीनला वाटत होते. मात्र सिक्कीमच्या सीमेवर भारत एवढा आक्रमक होईल याची कल्पना चीनला नव्हती. युरेपियन संसदेचे उपाध्यक्ष आरेसार्द चारनियेत्सकी यांनी आपल्या एका लेखात यासंदर्भातील उल्लेख केला आहे. 
 चारनियेत्सकी इपी टुडेसाठी लिहिलेल्या आपल्या लेखात  म्हणतात, भारत भूतानच्या सीमेच्या संरक्षणासाठी एवढी आक्रमक भूमिका घेईल अशी चीनची अपेक्षा नव्हती. १६ जूनला डोकलाममधील डोकला येथून झोम्पेलरी येथील भूतानी लष्कराच्या छावणीपर्यंत चीनने रस्ता बांधण्यास सुरुवात केली. भूतान आणि चीनमध्ये सीमा विवादाबाबत चर्चा सुरू असतानाच चीनने हे आक्रमक पाऊल  उचलले होते. मात्र भारताने हस्तक्षेप केल्याने चीनला रस्त्याचे काम पूर्ण करता आले नाही. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे.अधिक वाचा  (बॉम्बर विमानाची सवय करुन घ्या! जपानला चीनचा इशारा )(चीनच्या धमकीला ठेंगा, भारतीय लष्कराने डोकालममध्ये गाडले तंबू  )चीनच्या धमक्या आणखी वाढल्या )
चीनचे परराष्ट्र धोरण हे आंतरराष्ट्रीय नियमांनुसार नसल्याचेही चारनियेत्सकी यांनी सांगितले. तसेच १६ जूनला डोकला येथे रस्ता बांधण्यासाठी केलेला प्रयत्न हासुद्धा चुकीच्या परराष्ट्र धोरणाचा भाग आहे, असेही. त्यांनी सांगितले. भूतातनने मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून चीनच्या घुसखोरीचा विरोध केला होता. भूतान अशाप्रकारे विरोध करेल हे चीनला अपेक्षित होते. पण भारत आपला शेजारील देश असलेल्या भूतानच्या मदतीसाठी आक्रमकपणे धावून येईल, असे चीनला वाटले नव्हते. भूतानचा विरोध मोडून काढत झोम्पेलरीमध्ये रस्ता बनवू अशी चीनची अपेक्षा होती. ज्याचा त्यांना रणनीतीकदृष्ट्या मोठा फायदा होणार होता. पण  भारताच्या विरोधामुळे त्याला खिळ बसला आहे.