शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

भारत- चीन संबंध; वुहान शिखर परिषदेचा दीर्घकालीन फायदा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 13:58 IST

1950 साली चीनबरोबर राजनैतिक पातळीवर समाजवादी गटाच्याबाहेरील संबंध प्रस्थापित करणारा भारत हा पहिला देश होता. 1988 साली चीन आणि भारतातील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमिवर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी चीनला भेट दिली होती.

वुहान- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग यांची वुहान येथे भेट होत आहे. या परिषदेमध्ये दोन्ही नेते विविध विषयांवर चर्चा करत आहेत. मात्र या परिषदेचा भारताला व द्वीपक्षीय संबंधांना कितपत फायदा होईल याबाबत जाणकार शंका उपस्थित करत आहेत. चीनच्या वारंवार बदलल्या जाणाऱ्या भूमिकेमुळे भारत अजूनही या चर्चा परिषदांच्या यशाबाबत साशंक आहे.नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांची ही भेट नेहमीच्या भेटींपेक्षा वेगळी असणार आहे. ज्याप्रमाणे जिनपिंग यांचे साबरमती नदीकाठी अहमदाबाद येथे स्वागत केले गेले काहीशा तशाच प्रकारे वुहानमध्ये इस्ट लेक च्या काठावर त्यांचे स्वागत होईल त्याचप्रमाणे दोन्ही नेते इस्ट लेकमध्ये बोटिंगचा आनंदही घेतील.

भारत आणि चीन यांचे राजनैतिक संबंधांना गेली सात दशकांचा इतिहास आहे. 1950 साली चीनबरोबर राजनैतिक पातळीवर समाजवादी गटाच्याबाहेरील संबंध प्रस्थापित करणारा भारत हा पहिला देश होता. 1988 साली चीन आणि भारतातील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमिवर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी चीनला भेट दिली होती.1993 साली नरसिंह राव पंतप्रधानपदी असताना चीनला गेले होते. त्यांनी प्रत्यक्ष ताबारेषेजवळ दोन्ही देशांनी शांततेचे वातावरण कायम राहावे यासाठी चीनबरोबर करारावर स्वाक्षऱी केली. 2003 साली पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी चीनला भेट दिली. यावेळेस सीमेचे आरेखन व इतर विषयांबाबत चर्चा करण्यात आली.  एप्रिल 2005मध्ये चीनचे पंतप्रधान वेन जियाबाओ भारतामध्ये आले होते. तेव्हा शांततेसाठी सहकार्याचा करार दोन्ही देशांमध्ये करण्यात आला. 2006 साली हु जिंताओ भारतात आले तर 2008 साली भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी चीनला भेट देऊन काही प्रलंबित विषयांवर चर्चा केली. डिसेंबर 2010मध्ये चीनचे पंतप्रधान वेन जियाबाओ भारतात आले तेव्हा दोन्ही देशांचा व्यापार 2015 पर्यंत 100 अब्ज डॉलर्सवर नेण्याचा करार करण्यात आला. 2012 साली हु जिंताओ ब्रिक्स परिषदेसाठी भारतात आले होते. 2014 साली शी. जिनपिंग भारतात आले होते तेव्हा विविध विषयांवर 16 करार करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 साली चीनला पहिल्यांदा भेट दिली होती. चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांच्याशी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली होती. 2016 साली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी चीनमध्ये बीजिंग सह गुआंगडोंगला भेट दिली आणि दोन्ही देशांच्या विविध विद्यापिठांचे कुलगुरु व उच्च शिक्षण संस्थांच्या प्रमुखांच्या परिषदेत सहभाग घेतला.2016 साली जिनपिंग गोव्यामध्ये ब्रिक्स परिषदेला उपस्थित राहिले तर 2017 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी झियामेन येथील ब्रिक्स परिषदेला व हँग्झोऊ येथील जी-20 परिषदेला उपस्थित राहिले. या दोन्ही नेत्यांची जून 2016 साली ताश्कंद व 2017 साली अस्ताना येथेही भेट झालेली आहे.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी