भारत अन् चीनला विकसनशील देशांचे लाभ नको- ट्रम्प

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 04:05 PM2019-08-14T16:05:11+5:302019-08-14T16:05:41+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनला विकसनशील देशांसारख्या मिळणाऱ्या लाभावर टीका केली आहे.

india china no longer developing nations said donald trump | भारत अन् चीनला विकसनशील देशांचे लाभ नको- ट्रम्प

भारत अन् चीनला विकसनशील देशांचे लाभ नको- ट्रम्प

Next

वॉशिंग्टनः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनला विकसनशील देशांसारख्या मिळणाऱ्या लाभावर टीका केली आहे. जागतिक व्यापार संस्थे(डब्ल्यूटीओ)ला विकसनशील देशांची नवी व्याख्या करण्याची आवश्यकता आहे. भारत आणि चीन या आशियातील मोठ्या अर्थव्यवस्था झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना विकसनशील देशांप्रमाणे लाभ देणं थांबवलं पाहिजे. या दोन्ही देशांना WTOमधून मिळणारे फायदे तात्काळ बंद करायला हवेत.

ट्रम्प अमेरिकेच्या उत्पादनांवर लावलेल्या आयात करामुळे भारतावर नेहमीच टीका करत असतात. तर दुसरीकडे अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध भडकले आहे. ट्रम्प यांनी चिनी वस्तूंवर दंडात्मक कर आकारल्यानंतर चीननंही ट्रम्प यांना त्याच भाषेत उत्तर दिलं आहे. कोणत्या देशाला कशा प्रकारे विकसनशील देशाचा दर्जा मिळतो हे WTOनं स्पष्ट करावं, असंही जुलैमध्ये ट्रम्प यांनी सांगितलं होतं. चीन, तुर्कस्थान आणि भारतासारख्या देशांना मिळणारे लाभ बंद करण्याच्या उद्देशानंच ट्रम्प यांनी हे पाऊल उचललं आहे. तसेच कोणतीही विकसित अर्थव्यवस्था WTOतून फायदा मिळवत असल्यास त्या देशावर दंडात्मक कारवाई करावी, असे अधिकारही ट्रम्प यांनी अमेरिकी व्यापार प्रतिनिधीं(यूएसटीआर) ना बहाल केले आहेत.

पेनसिल्व्हेनियामध्ये एका सभेला संबोधित करताना ट्रम्प म्हणाले, भारत आणि चीन या आशियातल्या दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था आहेत. ते आता विकसनशील देश राहिलेले नाहीत. त्यामुळे त्यांना डब्लूटीओचे लाभ मिळू नये. तरीही ते विकसनशील देशांना मिळणाऱ्या सवलतींचा फायदा उठवत आहेत. त्यामुळे अमेरिकेला नुकसान पोहोचत आहे. डब्ल्यूटीओ अमेरिकेबरोबर निष्पक्षरीत्या व्यवहार करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध छेडलं गेलं आहे. अमेरिकेनं चीनच्या उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात आयातशुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधले संबंध तणावपूर्ण झाले आहे.  

Web Title: india china no longer developing nations said donald trump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.