शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

चीन वाढवतोय आण्विक शस्त्रसाठा, भारतानंही कंबर कसली; जाणून घ्या, कुणाकडे किती साठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 14:46 IST

आण्विक शस्त्रांवर नजर ठेवणारी आंतरराष्‍ट्रीय संस्‍था सिप्रीने म्हटले आहे, की भारत आणि चीन या दोघांनीही गेल्या वर्षी आपल्याकडील आण्विक शस्त्रांमध्ये वाढ केली आहे. मात्र, भारताकडील आण्विक शस्त्रे चीनच्या तुलनेत अर्ध्याहूनही कमी आहेत.

ठळक मुद्देचीनने आता पहिल्यांदाच जमीन, हवा आणि समुद्रातून मारा करता येतील, असे आण्विक शस्त्र तयार करायला सुरुवात केली आहे. जगातील एकूण 9 आण्विक शस्त्र संपन्न राष्ट्रेजगातील 90 टक्के आण्विक शस्त्र अमेरिका आणि रशियाकडे आहेत.

स्‍टॉकहोम : जागतीक महासत्ता बणण्याचे स्वप्न पाहत असलेला चीन आता झपाट्याने आण्विक क्षस्त्रांचा साठा वाढवू लागला आहे. चीनने आता पहिल्यांदाच जमीन, हवा आणि समुद्रातून मारा करता येतील, असे आण्विक शस्त्र तयार करायला सुरुवात केली आहे. मात्र, हे सर्व सुरू असतानाच, भारतानेही चीन आणि पाकिस्‍तानचा सामना करण्यासाठी कंबर कसली आहे आणि आपल्याकडीलही अण्विक शस्त्रसाठा वाढवायला सुरुवात केली आहे.

आण्विक शस्त्रांवर नजर ठेवणारी आंतरराष्‍ट्रीय संस्‍था सिप्रीने म्हटले आहे, की भारत आणि चीन या दोघांनीही गेल्या वर्षी आपल्याकडील आण्विक शस्त्रांमध्ये वाढ केली आहे. मात्र, भारताकडील आण्विक शस्त्रे चीनच्या तुलनेत अर्ध्याहूनही कमी आहेत. सिप्रीच्या अहवालानुसार, भारताकडे 150 तर चीनकडे 320 आण्विक शस्त्रे आहेत. गेल्या वर्षात चीनने 30 आण्विक शस्त्र तयार केली आहेत. तर भारताने 10 आण्विक शस्त्र तयार केली आहेत.

CoronaVirus News: होऊ नयेत अमेरिकेसारखे हाल; म्हणून, कोरोनावर मात करण्यासाठी मोदी सरकारचा प्लॅन तयार

पाकिस्‍तानकडे एकूण 160 आण्विक शस्त्र -पाकिस्तानकडे भारतापेक्षा अधिक आण्विक शस्त्र आहेत. त्यांच्याकडे एकूण 160 आण्विक शस्त्र आहेत. भारत-चीन यांच्यात तणावाचे वातावरण असताना आणि लडाखमध्ये दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकलेले असतानाच सिप्रीचा हा अहवाल आला आहे. 

दिलासादायक! कोरोना होतोय हद्दपार; 'या' 26 देशांमध्ये आता एकही रुग्ण नाही

अमेरिका-रशियामुळे घटली जगातील आण्विक शस्त्रांची संख्याएकीकडे आण्विक शस्त्रास्त्रांनी संपन्न असलेले आशियातील तीन देश आण्विक शस्त्रांस्त्रांची संख्या वाढवत आहेत. तर जगातील एकूण आण्विक शस्त्रांच्या संख्येत घट झाल्याचे दिसत आहे. या अहवालात म्हणण्यात आले आहे, की जगातील 90 टक्के आण्विक शस्त्र अमेरिका आणि रशियाकडे आहेत. मात्र, ते आपले आण्विक शस्त्र नष्ट करत आहेत. जगातील एकूण 9 आण्विक शस्त्र संपन्न राष्ट्रे, अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्‍तान, इस्रायल आणि उत्‍तर कोरिया यांच्याकडे एकूण 13,400 आण्विक शस्त्र आहेत. गेल्या वर्षांत या शस्त्रांची एकूण संख्या 13,865 एवढी होती.

CoronaVirus News: धक्कादायक! देशातील 50%वर कोरोनाबाधित फक्त 6 शहरांत, महाराष्ट्रातल्या तीन बड्या शहरांचा समावेश

टॅग्स :chinaचीनIndiaभारतPakistanपाकिस्तानAmericaअमेरिकाrussiaरशिया