शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

India China Faceoff: भारताला खास मित्राचं बळ; चीनला टक्कर देण्यासाठी पाठवणार लष्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 08:15 IST

चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे आशियामध्ये अशांतता; तणाव वाढला

ठळक मुद्देचीनची दादागिरी रोखण्यासाठी अमेरिका सैन्य पाठवणारअमेरिकन जवानांच्या तैनातीचा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आढावायुरोपमधील सैन्य आशिया खंडात हलवणार; जर्मनीपासून सुरुवात

नवी दिल्ली: विस्तारवादी धोरणामुळे अनेक देशांसोबत सीमावाद उकरून काढणाऱ्या चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी आता अमेरिकेनं कंबर कसली आहे. कोरोना संकटामुळे अमेरिका आणि चीनचे संबंध बिघडले आहेत. त्यात आता चीनच्या विस्तारवादी भूमिकेमुळे आशियामध्ये निर्माण झालेल्या तणावाची भर पडली आहे. त्यामुळे आता अमेरिका आपलं युरोपमध्ये तैनात असलेलं सैन्य आशियामध्ये तैनात करणार आहे. अमेरिका सर्वप्रथम जर्मनीतून आपलं सैन्य हटवणार आहे. जर्मनीत अमेरिकेचे ५२ हजार सैनिक तैनात आहेत. त्यातले ९,५०० सैनिक आशियामध्ये हलवले जाणार आहेत. लडाखमधील सीमावादावरून चीन आणि भारताचे संबंध बिघडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं घेतलेला हा निर्णय अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपीन्स या देशांनाही चीनकडून धोका आहे. त्यामुळेच अमेरिकेनं आशिया खंडात सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.चीनमुळे भारतासोबतच आग्नेय आशियाला धोका निर्माण झाल्याचं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो म्हणाले. 'चीनमुळे भारत, मलेशिया, इंडोनेशिया आणि फिलिपीन्ससारख्या आशियाई देशांसमोर आव्हान उभं राहिलं आहे. त्यामुळेच अमेरिकेकडून जगभरात तैनात असलेल्या सैन्याचा आढावा घेतला जात आहे. आवश्यकता भासल्यास त्यांना चिनी सैन्याचा मुकाबला करण्यासाठी तैनात केलं जाईल,' असं पॉम्पियो म्हणाले. ते जर्मन मार्शल फंडच्या व्हर्च्युअल ब्रसेल्स फोरममध्ये बोलत होते.पीपल्स लिबरेशन आर्मीशी (चिनी सैन्य) दोन हात करण्याच्या दृष्टीनं आमची तयारी सुरू असल्याची माहिती पॉम्पियो यांनी दिली. 'चिनी लष्कराच्या कारवाया सध्याच्या घडीचं मोठं आव्हान आहेत आणि त्यांचा सामना करण्यासाठी सर्व संसाधनं योग्य ठिकाणी असावीत यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार सैनिकांच्या तैनातीचा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे जर्मनीत सेवा बजावत असलेल्या सैनिकांची संख्या कमी केली जाईल. सध्या जर्मनीत अमेरिकेचे ५२ हजार सैनिक कर्तव्य बजावत आहेत. ही संख्या २५ हजारांवर आणली जाईल,' असं पॉम्पियो यांनी सांगितलं.आता चीनची नवी घुसखोरी; गलवान खोऱ्यातही ठोकले तंबू!ड्रॅगनचा तीळपापड! भारतीय जवानांनी चीनकडून नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्नच पाडला हाणून