शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानवर नजर ठेवण्यासाठी भारत करू शकतो अमेरिकेची मदत- निक्की हेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 16:41 IST

अमेरिकेची राजदूत निक्की हेली यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणेच पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना मिळणा-या समर्थनाच्या विरोधात कडक भूमिका मांडली आहे.

संयुक्त राष्ट्रे- अमेरिकेची राजदूत निक्की हेली यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणेच पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना मिळणा-या समर्थनाच्या विरोधात कडक भूमिका घेतली आहे. त्यामुळेच आता पाकिस्तानवर नजर ठेवण्यासाठी भारत अमेरिकेची मदत करणार आहे. अफगाणिस्तान व दक्षिण आशियातल्या दहशतवादाशी दोन हात करण्यासाठी ट्रम्प यांनी घोषित केलेली रणनीतीचा उल्लेख करतहेली म्हणाल्या, या रणनीतीच्या माध्यमातून भारतासोबत अमेरिकेची धोरणात्मक भागीदारी विकसित होणार आहे. आमच्यासाठी धोका असलेल्या अफगाणिस्तान व दक्षिण आशियातील दहशतवादी संघटनांना नेस्तनाबूत करणं आमच्या हिताचं आहे. तसेच आण्विक शस्त्रास्त्रांना दहशतवाद्यांपासून दूर ठेवायचं आहे. त्यासाठी आम्ही आमच्या राष्ट्रीय, ऊर्जा, अर्थव्यवस्था, कूटनीती व सेना या सर्व आयुधांचा वापर करू.अमेरिका-भारत मैत्री परिषदेत आयोजित एका कार्यक्रमात हेली म्हणाल्या, ट्रम्प यांनी पाकिस्तानकडून दहशतवाद्यांनी मिळणा-या समर्थनावर कडक भूमिका घेतली आहे. अमेरिका, अफगाणिस्तानमध्ये जास्त करून आर्थिक व विकासाच्या क्षेत्रातील मदतीसाठी भारताकडे आशेनं पाहिलं जातंय. अफगाणिस्तानला खरंच भारताच्या मदतीची गरज आहे. ते दोन्ही देश त्या क्षेत्रात चांगले शेजारी व भागीदार आहेत, असंही हेली म्हणाल्या आहेत.भारत अफगाणिस्तानमध्ये लष्कराची तुकडी पाठवणार नाही, असं संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं. अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. भारतानं अफगाणिस्तानाच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहेत, गरज पडल्यास त्याचं आम्ही सविस्तर विश्लेषण करू. केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी अमेरिकेच्या समोरच भारत अफगाणिस्तानात सैन्य पाठवणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्लीच अफगाणिस्तानच्या नव्या रणनीतीची घोषणा केली आहे. या रणनीतीत भारत सर्वाधिक सक्रिय भूमिका निभावेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भारत अफगाणिस्तानमध्ये सैन्य पाठवेल, अशी शक्यताही वर्तवण्यात येत होती. गेल्या 16 वर्षांपासून संघर्षग्रस्त अफगाणिस्तानात भारतीय लष्करानं दखल दिली नव्हती. अमेरिकेच्या अफगाणिस्तान रणनीतीत पाकिस्तानची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे.

निर्मला सीतारामन आणि जेम्स मॅटिस यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पत्रकारांनी पाकिस्तानच्या मुद्द्यावरही छेडले असता, पाकिस्तानचा मुद्दा भारतानं अमेरिकेसमोर उपस्थित केल्याचं सीतारामन यांनी स्पष्ट केलं होतं. तसेच दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणा-या शक्तींना नेस्तनाबूत करू, असंही या संयुक्त पत्रकार परिषदेत विधान जारी करण्यात आलं होतं. जेम्स मॅटिस म्हणाले, दहशतवाद्यांना सुरक्षितरीत्या आश्रय देणा-यांना सहन केलं जाणार नाही. भारत आणि अमेरिका दहशतवाद संपवण्यासाठी संयुक्तरीत्या काम करेल.

टॅग्स :AmericaअमेरिकाPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादIndiaभारत