दहशतवाद्यांविरुद्ध भारत, बांगलादेशची योजना

By Admin | Updated: November 21, 2014 03:19 IST2014-11-21T03:19:29+5:302014-11-21T03:19:29+5:30

भारत आणि बांगलादेशची सुरक्षा दले खुल्या सीमेलगत इस्लामी दहशतवाद्यांविरुद्ध एकाचवेळी धाडी टाकण्याची योजना बनवत असून उभय देशांनी सीमेच्या दोन्हीकडे सक्रिय

India, Bangladesh plan against terrorists | दहशतवाद्यांविरुद्ध भारत, बांगलादेशची योजना

दहशतवाद्यांविरुद्ध भारत, बांगलादेशची योजना

ढाका : भारत आणि बांगलादेशची सुरक्षा दले खुल्या सीमेलगत इस्लामी दहशतवाद्यांविरुद्ध एकाचवेळी धाडी टाकण्याची योजना बनवत असून उभय देशांनी सीमेच्या दोन्हीकडे सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांच्या यादीची देवाणघेवाणही केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अटक टाळण्यासाठी दहशतवाद्यांना कुठेही जागा मिळू नये यासाठी एकाचवेळी मोहिमा राबविणे महत्त्वाचे आहे, असे बांगलादेशच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. भारताची राष्ट्रीय तपास संस्था एनआयएच्या चार सदस्यीय शिष्टमंडळाने बर्दवान स्फोटप्रकरणी गुप्तचर माहिती मिळविण्यासाठी नुकताच बांगलादेशचा दौरा केला

Web Title: India, Bangladesh plan against terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.