फोनसाठी येणार तंबाखूसारखा धोक्याचा इशारा; स्मार्टफोनवर येत राहणार संदेश; स्पेनमध्ये लवकरच कायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 12:12 IST2024-12-06T12:12:08+5:302024-12-06T12:12:49+5:30

समितीने डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करताना त्यांच्या स्क्रीन टाइमबद्दल विचारण्याचा सल्लाही दिला आहे. मुलांच्या स्मार्टफोन वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पेन कायदा बनवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी ५० सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती.

Incoming tobacco hazard alert for phone Incoming messages on smartphones; Law soon in Spain | फोनसाठी येणार तंबाखूसारखा धोक्याचा इशारा; स्मार्टफोनवर येत राहणार संदेश; स्पेनमध्ये लवकरच कायदा

फोनसाठी येणार तंबाखूसारखा धोक्याचा इशारा; स्मार्टफोनवर येत राहणार संदेश; स्पेनमध्ये लवकरच कायदा

माद्रिद : तंबाखू, धूम्रपान आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे संदेश पॅकेटवर लिहिलेले असतात, तसेच संदेश आता स्मार्टफोनसाठीही आपल्या मोबाइलवर दिसणार आहेत. स्पेनमध्ये लवकरच असे इशारे देण्यात येणार आहेत. स्मार्टफोनच्या वापराबाबत तज्ज्ञांच्या समितीने स्पेन सरकारला याबाबत सल्ला दिला आहे.

समितीने डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करताना त्यांच्या स्क्रीन टाइमबद्दल विचारण्याचा सल्लाही दिला आहे. मुलांच्या स्मार्टफोन वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पेन कायदा बनवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी ५० सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती.

मुलांच्या फोन वापरावर येणार बंधणे

समितीने १३ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी डिजिटल उपकरणांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला आहे. मुलांना ३ वर्षांपर्यंत डिजिटल उपकरणे देऊ नयेत, अशी शिफारसही आहे.

६ वर्षांपर्यंतच्या मुलांना हे उपकरण अगदी आवश्यक असेल तेव्हाच दिले पाहिजे. ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांना इंटरनेटशिवाय फोन वापरण्याची परवानगी द्यावी. मुलांना मनोरंजनासाठी खेळ आणि मैदानी खेळ खेळण्याचा सल्लाही २५० पानी अहवालात देण्यात आला आहे.

स्क्रीनवर चेतावणी देणारे पॉप-अप संदेश

सोशल मीडिया ॲप्स वापरताना आरोग्यविषयक इशारे दाखविण्यासही या अहवालात सांगण्यात आले आहे.

यासाठी ॲप कंपन्यांनी ॲप वापरण्यापूर्वी किंवा वापरताना स्क्रीनवर चेतावणी देणारे पॉप-अप संदेश द्यावेत, असा सल्ला समितीने दिला आहे.

या पॉप-अप संदेशांमध्ये ॲप वापरण्याचे आरोग्य धोके आणि वापरण्यासाठी कमाल वेळ मर्यादा दर्शविली जाईल.

या समितीने स्मार्टफोन वापराच्या व्यसनाची सार्वजनिक आरोग्याची चिंता म्हणून नोंदणी करण्यास सांगितले आहे. स्मार्टफोनच्या वापरामुळे उद्भवणाऱ्या समस्यांचे त्वरित निराकरण करणे हा त्याचा उद्देश आहे.

Web Title: Incoming tobacco hazard alert for phone Incoming messages on smartphones; Law soon in Spain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.