पाकिस्तानात भिकाऱ्यांकडे बंगला, स्विमिंग पूल अन् SUV कार...; कसा चालतो हा व्यापार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 14:12 IST2025-05-19T14:11:35+5:302025-05-19T14:12:10+5:30

ज्याप्रकारे मार्केटिंग करण्यासाठी खास स्कील गरजेचे असते तसेच पाकिस्तानातील लोक हा व्यवसाय स्वीकारून भीक मागतात

In Pakistan, beggars have bungalows, swimming pools and SUV cars...; How does this business work? | पाकिस्तानात भिकाऱ्यांकडे बंगला, स्विमिंग पूल अन् SUV कार...; कसा चालतो हा व्यापार?

पाकिस्तानात भिकाऱ्यांकडे बंगला, स्विमिंग पूल अन् SUV कार...; कसा चालतो हा व्यापार?

घरात खायचे वांदे असताना भारताशी पंगा घेण्याच्या वल्गना करणाऱ्या पाकिस्तानातील लोक जगातील कुठल्याही कोपऱ्यात अथवा सार्वजनिक ठिकाणी भीक मागताना दिसून येतात. पाकिस्तानात भीक मागणे हा व्यवसाय झाला असून तिथले लोक याला एक प्रोफेशन म्हणून स्वीकारत आहेत. भीक मागणे पाकिस्तानात व्यापार बनला आहे. २०२४ पासून आजतागायत ५ हजार पाकिस्तानी भिकारी देशात परतले आहेत अशी माहिती इस्लामाबादमध्ये संसदेत अधिकृतपणे देण्यात आली. 

यावर्षी फेब्रुवारीत एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात व्यवसायाने डॉक्टर असलेल्या एका महिलेने दावा केला होता की, माझ्या लग्नाच्या काही दिवसांनी मला कळलं, माझ्या सासऱ्याचा बंगला, एसयूवी कार, स्विमिंग पूल आणि लग्झरी साहित्य भीकेच्या पैशातून खरेदी केले होते. त्यामुळे माझे लग्न शाही भिकारी कुटुंबात झाले आहे असं तिने म्हटलं होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तानात २ प्रकारचे भिकारी आढळतात. एक जे भीक मागून उदरनिर्वाह करतात तर दुसरे ज्यांची स्वप्ने मोठी असतात ते भीक मागतात. असे भिकारी पाकिस्तान सोडून दुसऱ्या देशात भीक मागण्यासाठी जातात. तिथे ते भीक मागतात. जागतिक पातळीवर भीक मागण्याचा मोठा व्यापार आहे. 

ज्याप्रकारे मार्केटिंग करण्यासाठी खास स्कील गरजेचे असते तसेच पाकिस्तानातील लोक हा व्यवसाय स्वीकारून भीक मागतात. कंपन्या ग्राहकांना त्यांचे सामान विकण्यासाठी खास योजना आखतात तसे भिकारी तसे वेषांतर करून वेगळ्या लूकमध्ये दिसून येतात. जेणेकरून समोरच्याचे लक्ष त्यांच्याकडे आकर्षिक होईल आणि मानवी भावनेतून ते त्यांना मदत करतील. सौदी अरबमधून ४४९८ भिकारी पुन्हा पाकिस्तानात पाठवल्याची माहिती पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने संसदेत दिली.

दरम्यान, ६ महिन्यापूर्वी पाकिस्तानातील गुजरांवाला येथील एका भिकाऱ्याच्या कुटुंबानं त्यांच्या आजीच्या मृत्यूच्या ४० व्या दिवशी २० हजार  लोकांसाठी एका मोठ्या मेजवानीचं आयोजन केलं होतं. पाहुण्यांना कार्यक्रमस्थळी नेण्यासाठी सुमारे २ हजार वाहनांची व्यवस्थाही केली होती. भिकारी आणि त्याच्या कुटुंबाने या कार्यक्रमावर सुमारे १.२५ कोटी पाकिस्तानी रुपये (भारतीय चलनात सुमारे ३८ लाख रुपये) खर्च केले होते. या घटनेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. 

Web Title: In Pakistan, beggars have bungalows, swimming pools and SUV cars...; How does this business work?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.