पाकिस्तानच्या पंतप्रधानांची जीभ घसरली, नरेंद्र मोदी सामान्य माणूस नसून...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 03:23 PM2020-06-28T15:23:07+5:302020-06-28T15:36:46+5:30

इम्रान खानने म्हटले की, 5 ऑगस्टपूर्वीच भारत व्याप्त काश्मीरच्या समस्येला जगभरात मांडण्यासाठी आम्ही आंदोलन उभारणार आहोत.

Imran Khan's tongue slipped, Narendra Modi is not an ordinary man ... | पाकिस्तानच्या पंतप्रधानांची जीभ घसरली, नरेंद्र मोदी सामान्य माणूस नसून...

पाकिस्तानच्या पंतप्रधानांची जीभ घसरली, नरेंद्र मोदी सामान्य माणूस नसून...

Next

इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये छापून येणाऱ्या उर्दु वृत्तपत्रातील यंदाच्या आठवड्यातील कोरोना व्हायरसशिवाय आणखी एका वृत्ताने खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय बनलं आहे. वृत्तपत्र अखबारच्या वृत्तानुसार, इम्रान खानने मोदींना वैफल्यग्रस्त म्हटले आहे. 

काश्मीरच्या मुद्दयावरुन पाकिस्तानने पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. पंतप्रधान इम्रान खानने नरेंद्र मोदींबद्दल अपशब्द वापरले आहेत. इम्रान खानने म्हटले की, 5 ऑगस्टपूर्वीच भारत व्याप्त काश्मीरच्या समस्येला जगभरात मांडण्यासाठी आम्ही आंदोलन उभारणार आहोत. भारत-पाकिस्तानच्या सीमारेषेवरील लोकांसाठी कल्याणाकारी योजना असलेल्या 'एहसास इमरजेंसी कैश प्रोग्राम' च्या उद्घाटनावेळी खान यांनी हे वक्तव्य केलंय. या योजनेद्वारे सीमारेषेवरील 1 लाख 38 हजारु कुटुंबांना रोख स्वरुपात आर्थिक मदत देण्यात आली. भारताच्या अधिपत्याखालील काश्मीरमध्ये नरेंद्र मोदी नरसंहार करत आहेत, यासंदर्भात जागतिक संघटनेनं दखल घेतली पाहिजे, असे इम्रान खान यांनी म्हटलंय. काश्मीरच्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी सुरु असलेल्या संघर्षाला ताकदीच्या जोरावर कुणीही दाबू शकत नाही, असेही खान यांनी म्हटलंय. तर, 'मोदी आम आदमी नहीं हैं, वो दिमाग़ी मरीज़ हैं और भारत को तबाही की तरफ़ ले जा रहे हैं.', असे शब्द इम्रान खानने पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वापरले आहेत. 

अमेरिकन सैन्याच्या ऑपरेशनबद्दल बोलताना, अल कायदाचा संस्थापक ओसाम बिल लादेन शहीद झाला असून तो दिवस कधीही विसरू शकणार नसल्याचं इम्रान खानने म्हटलंय. अमेरिकेने ओसामा बिन लादेनला एबटाबाद येथे येऊन ठार मारले, शहीद केले. तो दिवस मी कधीही विसरु शकत नाही. कारण, त्या घटनेनंतर संपूर्ण जगातून आम्हाला शिव्या देण्यात आल्या, अनेकांनी आम्हाला वाईट म्हटलं. आमचा सहकारी देश आमच्याच भूमित येऊन कुणालातरी ठार मारतोय, पण आम्हाला त्याची माहिती देत नाही. विशेष म्हणजे त्यांच्यासाठी आपल्या 70 हजार पाकिस्तानी लोकांनी जीव दिलाय, असेही इम्रान खानने संसदेतील भाषणात म्हटले. ओसामा बिल लादेनचा शहीद असा उल्लेख खानने केला आहे. दरम्यान, इम्रान खानच्या या भाषणाची सध्या पाकिस्तानमध्ये चांगलीच चर्चा होत आहे. मात्र, इम्रान यांचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, ट्विटरवर भारतीयांनी इम्रान खानला चांगलंच सुनावलंय. 
 

Web Title: Imran Khan's tongue slipped, Narendra Modi is not an ordinary man ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.