शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भारतासोबतच्या राजनैतिक संकटाला इमरान खान जबाबदार, पाकिस्तानातील विरोधी पक्षांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 03:22 IST

भारतासोबतच्या राजनैतिक संकटासाठी पंतप्रधान इमरान खान जबाबदार असल्याचा आरोप पाकिस्तानच्या दोन प्रमुख विरोधी पक्षांनी केला आहे.

इस्लामाबाद  - भारतासोबतच्या राजनैतिक संकटासाठी पंतप्रधान इमरान खान जबाबदार असल्याचा आरोप पाकिस्तानच्या दोन प्रमुख विरोधी पक्षांनी केला आहे. भारताशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न करताना इमरान खान यांनी घाई दाखविल्यानेच ही परिस्थिती उद्भवल्याचे या पक्षांनी म्हटले.परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचा प्रस्ताव ठेवण्यापूर्वी इमरान खान यांनी होमवर्क करायला हवे होते, असा टोलाही विरोधकांनी मारला. इमरान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून दहशतवाद आणि काश्मीरसारख्या मुद्यासह संबंध सुरळीत करण्यासारख्या आव्हानात्मक मुद्यांवर पुन्हा द्विपक्षीय चर्चा सुरू करण्याचा आग्रह केला होता. या महिन्यात न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या पार्श्वभूमीवर विदेशमंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे विदेश मंत्री महमूद कुरेशी यांच्यात द्विपक्षीय बैठक घेण्याला भारताने यापूर्वी सहमती दर्शविली होती. जम्मू-काश्मिरात तीन पोलिसांची हत्या आणि काश्मिरी अतिरेकी बुरहान वानी याची प्रतिमा उजळ करणारे डाक तिकीट जारी करून पाकिस्तानने आपला खरा चेहरा दाखवून दिला. एकीकडे संबंध सुरळीत करण्याची भाषा आणि दुसरीकडे दहशतवादाचे समर्थन या दुटप्पी भूमिकेचा निषेध करीत भारताने शुक्रवारी ही बैठक रद्द करण्याची घोषणा केली.  परराष्ट्र मंत्र्यांच्या स्तरावर चर्चेला होकार दिल्यानंतर भारताने दहशतवादी घटनांचा निषेध करीत बैठक रद्द करण्याचे पाऊल उचलल्यामुळे पाकिस्तान मुस्लीम लीग नवाज (पीएमएल-एन) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीने (पीपीपी) इमरान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या सरकारला जबाबदार धरले असल्याचे वृत्त डॉन या दैनिकाने दिले आहे. सरकारची तयारी नव्हती-पीएमएलमाजी विदेशमंत्री आणि पीएमएल-एनचे खासदार ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी इमरान खान यांच्यावर टीका करताना सरकारच पहिल्या दिवासापासूनच चर्चेसाठी तयार नव्हते असे प्रतीत होते. पाकिस्तान चर्चेसाठी यापूर्वीही तयार होता. आम्ही दोन देशांचे संबंध सामान्य करण्याच्या विरोधात नाही, मात्र पाकिस्तानने आपली प्रतिष्ठा कायम राखायला हवी, असे स्पष्ट केले. पीपीपीचे उपाध्यक्ष शेरी रहमान म्हणाले की, इमरान खान यांच्या सरकारने चर्चेसाठी भारताला अनुकूल करण्यापूर्वी पूर्ण होमवर्क करायला हवे होते.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानIndiaभारत