शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

इम्रान खान देशाविरुद्ध कट रचतायेत, पाक मंत्र्याने केला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 21:27 IST

Pakistan Political Crisis : कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींना चुकीच्या गुन्ह्यात अडकवणे आणि नंतर हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणे, हे यामागील उद्दिष्ट आहे, असाही आरोप राणा सनाउल्लाह यांनी शनिवारी रात्री पत्रकार परिषदेत आरोप केला.

पाकिस्तान हळूहळू आर्थिक संकटाच्या गर्तेत बुडत चालला आहे, पण पाकिस्तानमधील राजकीय उलथापालथ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. पाकिस्तानच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. दरम्यान, इम्रान खानचा पक्ष कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अधिकाऱ्यांना बदनाम करण्याचा कट रचत आहेत, असे गुप्तचर यंत्रणांनी फोन टॅपिंगमधील संभाषण उघड केल्यावरून सूचित होते, असा दावा पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी केला आहे. 

कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींना चुकीच्या गुन्ह्यात अडकवणे आणि नंतर हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणे, हे यामागील उद्दिष्ट आहे, असाही आरोप राणा सनाउल्लाह यांनी शनिवारी रात्री पत्रकार परिषदेत आरोप केला. तसेच, राणा सनाउल्लाह यांनी आपल्या दाव्यात म्हटले आहे की, देशाच्या एजन्सींनी टेपिंगमध्ये पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) नेत्याच्या घरावर छापा टाकला आणि बलात्काराचा खोटा खटला रचण्याचे संभाषण उघड केले आहे. मात्र, राणा सनाउल्लाह यांनी आपल्या दाव्याच्या बाजूने कोणतेही पुरावे दिलेले नाहीत.

दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी राणा सनाउल्लाह यांना प्रत्युत्तर दिले. राणा सनाउल्लाह हे स्पष्टपणे मीडियामध्ये येत असलेल्या बातम्या लपवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे इम्रान खान म्हणाले. तसेच, त्यांनी ट्विट केले की, तुरुंगात महिलांशी होणाऱ्या गैरवर्तनाबद्दल काही शंका असेल, तर या प्रमाणित गुन्हेगाराच्या पत्रकार परिषदेने अशा सर्व शंका दूर कराव्यात. 

60 हून अधिक नेत्यांनी सोडला पक्षदरम्यान, 9 मेच्या घटनेनंतर इम्रान खान यांच्या पीटीआयमधील 60 हून अधिक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. पक्षाचा त्याग करणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये सरचिटणीस असद उमर, ज्येष्ठ नेते फवाद चौधरी आणि माजी मंत्री शिरीन मजारी यांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे 9 मे रोजी इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या परिसरातून निमलष्करी दलाच्या जवानांनी अटक केली होती, त्यानंतर देशात हिंसक निदर्शने सुरू झाली होती. या अटकेच्या निषेधार्थ, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लाहोर कॉर्प्स कमांडर हाऊस, मियांवली एअरबेस आणि फैसलाबादमधील आयएसआय इमारतीसह डझनभर लष्करी आस्थापनांची तोडफोड केली होती.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान