शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
4
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
5
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
6
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
7
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
8
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
9
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
10
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
11
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
12
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
13
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
14
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
15
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
16
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
17
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
18
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
19
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
20
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात

पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांचा नवा विक्रम; वाचाल तर हसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 12:39 PM

इम्रान खान यांच्या नेतृत्त्वाखाली पाकिस्तानचा नवा विक्रम

इस्लामाबाद: पाकिस्तानमधीलइम्रान खान सरकारनं कर्जाचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. गेल्या वर्षभरात इम्रान खान यांच्या सरकारनं विक्रमी कर्ज घेतलं आहे. इम्रान खान यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पाकिस्तानी सरकारनं वर्षभरात तब्बल ७५०९ अब्ज (पाकिस्तानी) रुपयांचं कर्ज घेतलं आहे. त्यामुळे देशावरील असलेल्या एकूण कर्जात मोठी वाढ झाली आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्ताननं सरकारला कर्जाच्या रकमेची माहिती पाठवली आहे. खान यांनी ऑगस्ट २०१८ मध्ये पंतप्रधान पदाची धुरा खांद्यावर घेतली. यानंतरच्या वर्षभरात त्यांनी परदेशातून २८०४ अब्ज रुपयांचं कर्ज घेतलं. तर देशांतर्गत संस्थांकडून ४७०५ अब्ज रुपये कर्ज म्हणून घेतले. त्यामुळे पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. कर्ज फेडण्यात अपयशी ठरत असल्यानं पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानमधील सूत्रांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, सध्याच्या आर्थिक वर्षातील पहिल्या दोनच महिन्यात पाकिस्तानच्या डोक्यावरील कर्जात १.४३ टक्क्यांची वाढ झाली आहे. खान यांनी पंतप्रधानपद स्वीकारलं, त्यावेळी देशावरील एकूण कर्ज २४,७३२ रुपये होतं. आता हा आकडा थेट ३२,२४० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. एका बाजूला कर्जाचा डोंगर वाढत असताना दुसऱ्या बाजूला पाकिस्तान सरकारकडे जमा होणारा कर अतिशय आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत १ ट्रिलियन रुपये कर गोळा करण्याचं लक्ष्य सरकारनं ठेवलं होतं. मात्र प्रत्यक्षात कर संकलन कमी झाल्यानं पाकिस्तान सरकारसमोरील अडचणी वाढल्या आहेत. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान