...म्हणून आम्ही अभिनंदनची सुटका केली; आधी घाम फुटलेल्या पाकिस्तानचा आता भलताच दावा

By कुणाल गवाणकर | Published: October 30, 2020 08:56 AM2020-10-30T08:56:20+5:302020-10-30T08:57:00+5:30

Wing Commander Abhinandan: विरोधी पक्षाच्या खासदाराच्या दाव्यामुळे पाकिस्तानची पोलखोल; सरकारकडून स्पष्टीकरण

imran khan government claims there was no pressure on pakistan to release abhinandan varthaman | ...म्हणून आम्ही अभिनंदनची सुटका केली; आधी घाम फुटलेल्या पाकिस्तानचा आता भलताच दावा

...म्हणून आम्ही अभिनंदनची सुटका केली; आधी घाम फुटलेल्या पाकिस्तानचा आता भलताच दावा

Next

नवी दिल्ली: भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानची पोलखोल झाली आहे. भारताच्या हवाई हल्ल्यांनंतर आणि विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पकडले गेल्यावर पाकिस्तानातील परिस्थिती काय होती, याची माहिती पाकिस्तानी संसदेत विरोधी पक्षाचे खासदार अयाज सादिक यांनी दिली. अभिनंदन यांची सुटका न केल्यास भारत हल्ला करेल, याची भीती लष्करप्रमुखांना वाटत होती. त्या भीतीनं त्यांचे पाय थरथर कापत होते. त्यांना घाम फुटला होता, असं सादिक यांनी संसदेत सांगितलं. यावरून अडचणीत आलेल्या इम्रान खान सरकारनं आता स्पष्टीकरण दिलं आहे. 

"पाक लष्करप्रमुखांचे पाय भीतीनं थरथर कापत होते, घाम फुटला होता, हल्ल्याच्या भीतीनं अभिनंदनला सोडलं"

अभिनंदन यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानवर कोणताही दबाव नव्हता, असं पाकिस्तान सरकारनं स्पष्ट केलं आहे. हल्ल्याची भीती वाटत असल्यानं पाकिस्तान सरकारनं भारतासमोर झुकण्याचा निर्णय घेतला. त्यांनी थेट भारतासमोर गुडघे टेकले, अशा शब्दांत सादिक यांनी संसदेत इम्रान खान सरकारची पोलखोल केली. सादिक यांच्या विधानांवर अखेर इम्रान खान सरकारनं स्पष्टीकरण दिलं आहे.

अभिनंदन यांची सुटका झाली नसती तर...; हवाई दलानं सांगितली काय होती रणनीती

विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानवर कसलाही दबाव नव्हता, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जाहिद हफीज चौधरींनी दिली. आम्ही शांतता पाळण्याच्या हेतूनं अभिनंदन यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला. आमच्या निर्णयाचं आंतरराष्ट्रीय समुदायानं स्वागत केलं होतं, असं चौधरी म्हणाले.

कशामुळे झाला पाकिस्तानचा पर्दाफाश?
भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानमधील परिस्थिती काय होती, याची माहिती पाकिस्तानच्या संसदेचे माजी अध्यक्ष अयाज सादिक यांनी सभागृहात दिली. 'भारत हल्ला करेल या भीतीनं तेव्हा पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांचे पाय कापत होते. त्यांच्या चेहऱ्यावर घाम अगदी स्पष्ट दिसत होता. बाजवा यांना भारताच्या हल्ल्याची भीती वाटत होती,' असं सादिक यांनी सभागृहाला सांगितलं.

अभिनंदन यांच्या सुटकेबद्दलचा निर्णय घेण्यासाठी आयोजित बैठकीला परराष्ट्रमंत्री महमूद शाह कुरेशी उपस्थित होते, अशी माहितीही सादिक यांनी दिली. 'कुरेशी त्या बैठकीला उपस्थित असल्याचं मला आठवतं. त्या बैठकीला हजर राहण्यास पंतप्रधान इम्रान खान यांनी नकार दिला होता. कुरेशी यांचे पाय कापत होते. त्यांना घाम फुटला होता. अभिनंदन यांची सुटका करा. अन्यथा भारत हल्ला करेल, असं आम्ही कुरेशी यांनी म्हटलं होतं,' असं सादिक म्हणाले.



भारताकडून हल्ला होण्याच्या भीतीनं पाकिस्ताननं विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका केल्याचं पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री ख्याजा मोहम्मद आसिफ यांनी संसदेत म्हटलं. 'पाकिस्तानचं सरकार प्रचंड घाबरलं होतं. त्यामुळे त्यांनी जराही वेळ न घालवता अभिनंदन यांच्या सुटकेचा निर्णय घेतला. त्यांनी भारतासमोर गुडघे टेकले. भारताला खूष करण्यासाठी अभिनंदन यांची सुटका करण्यात आली,' असं आसिफ म्हणाले. 

Web Title: imran khan government claims there was no pressure on pakistan to release abhinandan varthaman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.