शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
6
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
7
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
8
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
9
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
10
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
11
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
12
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
13
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
14
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
15
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
16
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
17
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
18
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
19
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
20
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना

भारतासोबत संबंध सुधारा, तरच परिस्थिती सुधारेल; पाकिस्तानी माध्यमांचा सरकारला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 15:27 IST

पाकिस्तान गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटात सापडलाय.

पाकिस्तान गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटात सापडलाय. महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असून तेल, डाळ, पीठांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे देशभरात सरकारविरोधात निदर्शने केली जात आहेत. तर दुसरीकडे सरकार आयएमएफकडे कर्जासाठी प्रयत्न करत आहे. पण, अजुनही आयएमएफ ने कर्ज दिलेले नाही, यामुळे पाकिस्तानची परिस्थिती आणखी बिघडली आहे. आर्थिक परिस्थिती बिघडूनही पाकिस्तानन सरकारने भारताविरोधात बोलण्याचे थांबवलेले नाही. यापार्श्वभूमीवर आता पाकिस्तानमधील माध्यमांनी सरकारला भारतासोबत संबंध सुधारण्याचा सल्ला दिलाय.

पाकिस्तानमध्ये आता सत्ताधाऱ्यांच्या जुन्या भूमिकेतून यू-टर्न घेत भारतासोबतचे आर्थिक संबंध दृढ करण्याची वेळ आली आहे, असा सूर आळवला जात आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये उठलेली ही मागणी भारताचे उपउच्चायुक्त सुरेश कुमार यांच्या विधानानंतर समोर आली आहे, यात लाहोर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या एका कार्यक्रमात बोलताना कुमार यांनी शुक्रवारी सुचवले की, अनेक दशके जुना पाकिस्तान-भारत वाद मिटला पाहिजे. यासाठी दोन्ही देशांनी सखोल आर्थिक संबंध पुन्हा प्रस्थापित केले पाहिजेत.

कुमार म्हणाले, "भारताला पाकिस्तानसोबत चांगले संबंध हवे आहेत कारण आपण आपला भूगोल बदलू शकत नाही." कुमार यांनी दोन्ही देशांना व्यापार संबंध सामान्य करण्याचे आवाहन केले. यावर पाकिसितानमधील वृत्तपत्रात संपाककीय मध्येही ही मागणी केली आहे. ' लाहोर चेंबरने आपल्या समारंभासाठी भारतीय अधिकाऱ्याला आमंत्रित करणे आणि नवी दिल्लीच्या प्रतिनिधीने संबंध सुधारण्यासाठी बोलणे हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. वृत्तपत्राने संपादकीयमध्ये लिहिले आहे की, गेल्या काही वर्षांत विषारी वक्तृत्वाच्या युगाला निरोप देण्याची वेळ आली आहे. २०१९ मध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील घटनांनंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले आणि व्यापारी संबंधही संपुष्टात आले, असंही या संपादकीयमध्ये म्हटले आहे.

ICC नं काढलं अरेस्ट वॉरंट; भारत दौऱ्यावर आल्यावर पुतिन यांना अटक होऊ शकते का?

'या क्षणी हा पर्याय अशक्य वाटू शकतो, पण सध्याचे द्विपक्षीय संबंध लक्षात घेता, व्यापार संबंध पूर्ववत झाल्यास, पाकिस्तानच्या आर्थिक संकटांचे वाईट दिवस दूर होऊ शकतात. दोन्ही देशांमधील चांगले व्यापारी संबंध उपखंडात अधिक अनुकूल वातावरण निर्माण करू शकतात, असेही वृत्तपत्राने लिहिले आहे. भारत आणि आपल्या शेजारील इतर राज्यांशी व्यापार, खरेतर, व्यापक आशियाई प्रदेशात भौगोलिक-आर्थिक समज पुनर्संचयित करतो, जो पाकिस्तानसाठी फायदेशीर आहे, असंही यात म्हटले आहे.

पाकिस्तानच्या प्रमुख पाश्चात्य व्यापारी भागीदारांच्या – अमेरिका आणि युरोपीय संघाच्या – अर्थव्यवस्था मंदावल्या आहेत, असा दावाही पाकिस्तानी माध्यमांमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे प्रादेशिक व्यापारी भागीदारांसोबत सध्याचे सुस्त असलेले संबंध सुधारणे आवश्यक आहे, असंही यात म्हटले आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत