नेटवर तोतयागिरी; अमेरिकेत तारल पटेल यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 06:54 IST2024-06-14T06:53:59+5:302024-06-14T06:54:24+5:30
Taral Patel Arrested: अमेरिकेतील धोरण तज्ज्ञ व भारतीय वंशाचे असलेल्या तारल पटेल (३० वर्षे) यांना इंटरनेटवर तोतयागिरी करणे व तसेच स्वत:ची खरी ओळख लपविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल टेक्सास पोलिसांनी अटक केली आहे.

नेटवर तोतयागिरी; अमेरिकेत तारल पटेल यांना अटक
ह्यूस्टन : अमेरिकेतील धोरण तज्ज्ञ व भारतीय वंशाचे असलेल्या तारल पटेल (३० वर्षे) यांना इंटरनेटवर तोतयागिरी करणे व तसेच स्वत:ची खरी ओळख लपविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल टेक्सास पोलिसांनी अटक केली आहे. टेक्सास निवडणूक आचारसंहितेच्या नियमांचा भंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
प्रेसिंक्ट ३ कमिशनर पदासाठी पटेल यांनी आपली उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्यांनी काही गैरप्रकार केल्याची तक्रार दाखल झाली होती.