'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 10:04 IST2025-07-14T10:02:20+5:302025-07-14T10:04:29+5:30

उत्तर कोरियाचे किम जोंग उन यांनी रशियाची बाजू घेऊन अमेरिका आणि जपानला इशारा दिला आहे.

If you approach Russia North Korea's Kim Jong-un warns America, Japan | 'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा

'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा

उत्तर कोरियाचे किम जोंग उन यांनी रशियाची बाजू घेऊन अमेरिका आणि जपानला इशारा दिला आहे. त्यांनी रशियाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी म्हटले की, त्यांचा देश युक्रेन मुद्द्यावर रशियाला बिनशर्त पाठिंबा देत आहे आणि प्रत्येक पावलावर त्यांच्यासोबत आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह हे उत्तर कोरिया दौऱ्यावर आहेत. उत्तर कोरिया युक्रेन युद्धासाठी रशियाच्या वतीने लढण्यासाठी सैनिक पाठवत आहे आणि लष्करी उपकरणे पुरवत आहे.

आतापर्यंत उत्तर कोरियाने युक्रेनला १० हजार सैनिक पाठवले आहेत. याशिवाय उत्तर कोरियाने रशियाला मोठ्या प्रमाणात दारूगोळा देखील दिला आहे.

दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेनुसार, उत्तर कोरियाने आतापर्यंत रशियाला १.२ कोटी तोफखाना आणि टँक शेल पुरवले आहेत. लावरोव्हचा हा शेवटचा तीन दिवसांचा दौरा कोरियन पुरवठ्यावरील चर्चेसाठी असल्याचे मानले जात आहे. किम जोंग आणि लावरोव्ह यांची भेट वोनसान या किनारी शहरात झाली.

उत्तर कोरिया रशियाच्या बाजूने

किम जोंग ऊन यांनी सांगितले की, ते जागतिक शांततेसाठी रशियासोबत काम करण्यास तयार आहेत. युक्रेन युद्धाची कारणे दूर करण्याच्या निर्णयात उत्तर कोरिया रशियन नेतृत्वाच्या पूर्णपणे पाठीशी असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

येथेच दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमधील चर्चेत सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. रशिया आणि उत्तर कोरियाने २०२४ मध्ये संरक्षण करारावर स्वाक्षरी केली होती. या कराराअंतर्गत, दोन्ही देश कोणतेही युद्ध एकत्र लढतील.

उत्तर कोरियाचा जपान आणि दक्षिण कोरियाला इशारा

जर दक्षिण कोरिया आणि जपानकडून कोणताही सुरक्षा धोका निर्माण झाला तर त्यांचे सैन्य कारवाई करेल, अस रविवारी उत्तर कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले. अमेरिकेसोबत दोन्ही देशांच्या हवाई दलांच्या अलिकडच्या सरावावर उत्तर कोरियाने हा इशारा दिला आहे.

Web Title: If you approach Russia North Korea's Kim Jong-un warns America, Japan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.