शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 11:17 IST

अमेरिकेतील अलास्का येथे या दोन्ही नेत्यांमध्ये शुक्रवारी (१५ ऑगस्ट) युक्रेन युद्ध थांबवण्यासंदर्भात बैठक होणार आहे.

युक्रेनसोबतचे युद्ध थांबवले नाही, तर गभीर परिणाम होतील, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी दिली आहे. ट्रम्प बुधवारी म्हणाले, जर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारच्या बैठकीनंतर, युक्रेन युद्ध थांबवण्यास सहमती दर्शविली नाही, तर त्याचे 'अत्यंत गंभीर परिणाम' होतील. अमेरिकेतील अलास्का येथे या दोन्ही नेत्यांमध्ये शुक्रवारी (१५ ऑगस्ट) युक्रेन युद्ध थांबवण्यासंदर्भात बैठक होणार आहे. दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील जमिनीच्या देवाणघेवाणीवरही चर्चा होऊ शकते. मात्र, हे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी नाकारले आहे.

कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेची युद्धबंदीची  इच्छा -ट्रम्प यांनी बुधवारी युरोपीय नेत्यांसोबत व्हर्च्युअल बैठक केली. या बैठकीसंदर्भात बोलताना फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले, अलास्का येथे होणाऱ्या अमेरिका-रशिया शिखर परिषदेत, अमेरिकेची युद्धबंदीची इच्छा आहे, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की देखील या बाठकीत सहभागी झाले होते. दरम्यान, झेलेन्स्की यांनी पुतीन यांच्यावर, ट्रम्प यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीपूर्वीच फसवणुकीचा आरोप केला आहे.

झेलेन्स्की म्हणाले, "रशिया संपूर्ण युक्रेनवर कब्जा करण्यास सक्षम आहे हे दाखवण्यासाठी, पुतिन युक्रेनच्या आघाडीच्या सर्वच क्षेत्रांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच, पुतिन निर्बंधांसंदर्भातही खोटे बोलत आहेत. निर्बंधांचा आपल्यावर काहीही फरक पडत नाही, असे भासवण्याचाही ते प्रयत्न करत आहेत. मात्र, प्रत्यक्षात निर्बंध अत्यंत प्रभावी आहेत आणि रशियाच्या युद्ध, अर्थव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम होत आहे, असेही झेलेन्स्की म्हणाले. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पVladimir Putinव्लादिमीर पुतिनRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्धAmericaअमेरिका