शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

NATO चा हल्ला झाला, तर सर्वात पहिले 'खाक' होणार 'हे' देश, रशियाची खुली धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 15:43 IST

रशिया-युक्रेन युद्धा सुरू असतानाच रशिया आणि नाटो देशांमधील संघर्षही वाढताना दिसत आहे. अमेरिका आणि युरोपीय देश युक्रेनला आर्थिक, लष्करी आणि गुप्तचर मदत देत आहेत. यामुळे, रशिया याला नाटोचा थेट हस्तक्षेप मानत आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यात भीषण युद्ध सुरू असतानाच, व्लादिमीर पुतिन यांचे विशेष कमांडर तथा रशियन परराष्ट्र गुप्तचर संस्थेचे प्रमुख सर्गेई नारिश्किन यांनी पाश्चात्य देशांना मोठा इशारा दिला आहे. जर नाटोने रशिया अथवा जवळचा मित्र असलेल्या बेलारूसविरुद्ध कोणत्याही प्रकारची आक्रमक कारवाई केली, तर पोलंड आणि बाल्टिक देशांचा सर्वप्रथम विनाश होईल. रशियन वृत्तसंस्था आरआयएने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे. यामुळे, या भागातील भू-राजकीय तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले नारिश्किन? -नारिश्किन म्हणाले, "जर नाटोकडून रशिया अथवा बेलारूसविरुद्ध कोणतीही लष्करी कारवाई केली गेली, तर त्याचे परिणाम संपूर्ण नाटोला भोगावे लागतील. मात्र, सर्वात पहिले पोलंड आणि बाल्टिक देश बर्बाद होतील." नारिश्किन हे पुतिन यांच्या अत्यंत जवळचे आणि रशियन गुप्तचर विभागातील सर्वात शक्तिशाली चेहऱ्यांपैकी एक मानले जातात. त्यांच्या या विधानाचा अर्थ म्हणजे, रशिया पाश्चात्य युतीच्या कोणत्याही संभाव्य हस्तक्षेपाचा सामना करण्यास तयार आहे.

पोलंड आणि बाल्टिक देशच निशाण्यावर का? - पोलंड आणि अॅस्टोनिया, लातविया आणि लिथुआनिया सारखे बाल्टिक देश NATO चे सदस्य आहेत आणि रशियाच्या पश्चिमेकडील सीमेला लागून आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी रशिया विरोधी भूमिका घेत युक्रेनला समर्थन दिले आहे. तसेच रशिया या देशांना "नाटो फॉरवर्ड आउटपोस्ट" मानतो.

युक्रेन युद्ध आणि पाश्चात्य हस्तक्षेप -रशिया-युक्रेन युद्धा सुरू असतानाच रशिया आणि नाटो देशांमधील संघर्षही वाढताना दिसत आहे. अमेरिका आणि युरोपीय देश युक्रेनला आर्थिक, लष्करी आणि गुप्तचर मदत देत आहेत. यामुळे, रशिया याला नाटोचा थेट हस्तक्षेप मानत आहे. 

टॅग्स :russiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्ध