एकीकडे इराणमध्ये सत्ताविरोधी आंदोलन तीव्र झालेलं असतानाच दुसरीकडे अमेरिकेकडूनही इराणमधील शासकांवर दबाव आणला जात आहे. त्यामुळे इराण आणि अमेरिकेमध्ये कमालीचा तणाव वाढला आहे. अशा परिस्थितीत इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकर गालिबाफ यांनी एका तातडीच्या बैठकीनंतर मोठं विधान केलं आहे. अमेरिकेने इराणवर हल्ला केला तर इराण गप्प पसणार नाही. अशा परिस्थितीत इस्राइल आणि मध्य पूर्वेकडे असलेले अमेरिकेचे लष्करी आणि नौदलाच्या तळांना लक्ष्य केलं जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
गालिबाफ यांनी सांगितले की, इराणवर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणला जात आहे. तसेच देशाला अनेक आघाड्यांवर आव्हानांचा सामना करावा लागत आहे. आता ही लढाई केवळ हत्यारांपर्यंत मर्यादित राहिलेली नाही तर यामध्ये आर्थिक निर्बंध, अपप्रचार आणि सुरक्षेशी संबंधित आव्हानांचाही समावेश झाला आहे.
ते पुढे म्हणाले की, जर अमेरिकेने इराणवर सैनिकी हल्ला केला, तर अमेरिकेच्या नियंत्रणाखालील प्रदेश, इस्राईल आणि मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या लष्कर आणि नौदलाच्या अड्ड्यांना लक्ष्य केलं जाईल. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव सातत्याने वाढत असतानाच गालिबाफ यांनी हे विधान केलं आहे. तसेत त्यावरून आता आरोप प्रत्यारोपांना उधाण आलं आहे.
Web Summary : Amid rising tensions and internal protests, Iran warns the US that any attack will be met with retaliation targeting Israel and US military bases in the Middle East. Iran faces economic and security challenges.
Web Summary : बढ़ते तनाव और आंतरिक विरोध के बीच, ईरान ने अमेरिका को चेतावनी दी है कि किसी भी हमले का बदला इज़राइल और मध्य पूर्व में अमेरिकी सैन्य ठिकानों को निशाना बनाकर लिया जाएगा। ईरान आर्थिक और सुरक्षा चुनौतियों का सामना कर रहा है।