Sheikh Hasina Latest News: बांगलादेशातीलविद्यार्थीआंदोलनाने शेख हसीना यांना देशातून पळून जायला भाग पाडले. ऑगस्ट २०२४ मध्ये विद्यार्थीआंदोलन इतके चिघळले की, पंतप्रधान पदाला चिकटून बसलेल्या शेख हसीनांसमोर काही पर्याय उरला नाही. शेख हसीना पंतप्रधान पद सोडण्यास शेवटपर्यंत तयार नव्हत्या. मग त्यांना कुणी राजीनामा देण्यास सांगितलं?
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बांगलादेशात गेल्या वर्षी उसळलेल्या विद्यार्थी आंदोलनाने सत्तांतर घडवून आणले. हे आंदोलन शेख हसीना यांनी पोलीस आणि लष्करी बळाचा वापर करून दाबण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना काही यश आलं नाही. यात शेकडो विद्यार्थ्यांचे बळी गेले.
शेख हसीनांविरोधात आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादात प्रकरण
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या भारतात आश्रयाला आहेत. त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी बांगलादेश सरकारने केली आहे. दरम्यान, त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल असून, याचसंदर्भात आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादासमोर सुनावणी सुरू आहे.
पोर्थो आलू यांच्या रिपोर्टनुसार बांगलादेशचे मुख्य वकील मोहम्मद ताजूल इस्लाम यांनी शेख हसीना यांचा देश सोडण्यापूर्वीचा एका तासाचा घटनाक्रम समोर मांडला.
राजीनामा देण्याचा सल्ला, शेख हसीना भडकल्या
इस्लाम यांनी लवादासमोर मांडलेल्या माहितीनुसार, विद्यार्थी आंदोलन प्रचंड चिघळले होते. ४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या गणभवनमध्ये उच्च स्तरीय बैठक बोलावण्यात आली.
या बैठकीला मंत्रिमंडळातील महत्त्वाचे मंत्री, लष्करी दलांचे प्रमुख आणि इतर सुरक्षा दलाचे मुख्य अधिकारीही होते. याच बैठकीत शेख हसीना यांना तेव्हाचे सुरक्षा सल्लागार निवृत्त मेजर जनरल तारीक अहमद सिद्दिकी यांनी शेख हसीना यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला. हे ऐकून शेख हसीनांना राग आला आणि त्यांनी हा सल्ला धुडकावला. त्या लष्करप्रमुखांना म्हणाल्या की, आंदोलन चिरडून टाका.
याने तुम्हाला बुडवलंय आणि पुन्हा बुडवले
इस्लाम यांनी लवादाला दिलेल्या माहितीनुसार, त्यानंतर सिद्दिकींनी आंदोलकांवर गोळीबार करण्याचा सल्ला दिला. जेणेकरून आंदोलन दडपले जाईल. ढाकामध्ये जमलेल्या आंदोलकांवर हेलिकॉप्टरमधून गोळीबार करण्यात यावा, असे ते या बैठकीत म्हणाले होते. त्यावर बांगलादेशच्या हवाई दलप्रमुखांचे भडकले. ते शेख हसीनांना म्हणाले की, याने तु्म्हाला आधीच बुडले आहे आणि पुन्हा बुडवेन.
शेख हसीना यांचा बांगलादेशातील शेवटचा एक तास
५ ऑगस्ट २०२४. गणभवनमध्ये पुन्हा लष्करी अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत शेख हसीनांची बैठक झाली. या बैठकीत पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर लष्करी अधिकाऱ्याने शेख हसीनांना पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याचा सल्ला दिला. त्या पुन्हा भडकल्या आणि म्हल्या, मग असं करा की मला गोळ्या घाला आणि इथेच गणभवनमध्ये पुरून टाका.
आंदोलकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाला दिला वेढा
याच दरम्यान, लष्करी अधिकाऱ्यांनी शेख हसीना यांना सांगितले की, आंदोलकांनी पंतप्रधान निवासाला सगळीकडून घेरले आहे. तुमच्याकडे खूप कमी वेळ आहे. त्यावेळी हसीना यांची लहान बहीण शेख रेहाना राजीनामा देण्यासाठी विनवण्या करू लागली. ती शेख हसीनांच्या पायाही पडली. पण, शेख हसीना राजीनामा द्यायला तयार नव्हत्या.
...मग शेवटचा पर्याय
बाहेर आंदोलकांनी दिलेला वेढा आणि खूपच कमी वेळ असल्याने लष्करी अधिकाऱ्याने शेख हसीना यांच्या मुलाला कॉल केला. साजीब वाझेद जॉय हा शेख हसीना यांचा मुलगा. तो अमेरिकेत राहतो. त्याने शेख हसीना यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. रक्तपात टाळायचा असेल, तर सत्ता सोडावीच लागेल, असे साजीब वाझेद जॉय शेख हसीनांना म्हणाले आणि त्यानंतर शेख हसीनांनी राजीनामा दिला. ही सगळी माहिती सुनावणी दरम्यान, समोर आली.