ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 06:36 IST2025-05-25T06:36:35+5:302025-05-25T06:36:35+5:30
ॲपलचे सीईओ टीम कुकसोबतच्या चर्चेनंतर ते भारतात जाणार नाहीत, असा समज होता. मात्र, भारतात प्लांट उभारणार असे त्यांनी सांगितले.

ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
न्यूयॉर्क : ॲपलला भारतात उत्पादन करण्यासाठी जायचे असेल तर जावे. मात्र, तसे केले, तर कंपनीला टॅरिफ दिल्याशिवाय विक्री अमेरिकेत करता येणार नसल्याचा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ट्रम्प यांनी ऑफिसमध्ये अनेक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षऱ्या करताना हा धमकीवजा इशारा दिला आहे.
ॲपलचे सीईओ टीम कुकसोबतच्या चर्चेनंतर ते भारतात जाणार नाहीत, असा समज होता. मात्र, भारतात प्लांट उभारणार असे त्यांनी सांगितले. मग मी म्हणालो, जायचे तर जा. तिथे निर्माण केलेल्या उत्पादनाची विक्री अमेरिकेत टॅरिफशिवाय करू देणार नाही.