'जर मला काही झाले तर इराण पृथ्वीवर दिसणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 17:11 IST2025-02-05T17:09:01+5:302025-02-05T17:11:09+5:30

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर आर्थिक दबाव टाकण्यासाठी एक्झिक्यूटिव्ह ऑर्डरवर सही केली आहे.

If anything happens to me, Iran will not be seen on Earth Donald Trump warns | 'जर मला काही झाले तर इराण पृथ्वीवर दिसणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

'जर मला काही झाले तर इराण पृथ्वीवर दिसणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  ( Donald Trump ) यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. यावेळी ट्रम्प यांनी गाझाबाबतच्या ब्लू प्रिंटबाबत चर्चा केली. तसेच यावेळी त्यांनी इराणला इशारा दिला. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला. ट्रम्प म्हणाले, जर तेहरानने  मारण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी परिणामांना सामोरे जाण्यास तयार असले पाहिजे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणवर आर्थिक दबाव आणण्यासाठी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. जर इराणने मला मारण्याचा प्रयत्न केला तर ते नष्ट होतील, असंही ट्रम्प म्हणाले. इराणचे पृथ्वीवर काहीही शिल्लक राहणार नाही. जर असे झाले तर इराण पूर्णपणे नष्ट होईल, असे मी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

इकडे दिल्‍लीत मतदान, तिकडे न लढताच भाजपनं 215 जागा जिंकल्या...! काँग्रेसची शरणागती?

जर डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump )  यांची हत्या झाली तर अशा परिस्थितीत उपाध्यक्ष जेडी व्हान्स राष्ट्रपती होतील. अमेरिकन सरकार राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना इराणकडून असलेल्या संभाव्य धोक्यावर लक्ष ठेवून आहे.

गाझा संदर्भात अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या ५ कलमी आराखड्यात इराणचाही समावेश आहे. ट्रम्प यांनी इराणचे कंबरडे मोडण्यासाठी एका कार्यकारी आदेशावरही स्वाक्षरी केली आहे. यामध्ये अमेरिकन सरकारला इराणवर जास्तीत जास्त दबाव आणण्यास सांगितले आहे.

इस्रायलचे तीन उद्दिष्टे

डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump )  यांची भेट घेतल्यानंतर  इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले की, इस्रायल यापूर्वी कधीही इतका शक्तिशाली नव्हता तर इराण कधीही इतका कमकुवत नव्हता. मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी आपल्या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्याबद्दल आणि आपले भविष्य वाचवण्याबद्दल चर्चा केली. गाझामध्ये इस्रायलचे तीन उद्दिष्टे आहेत: पहिले, हमास पूर्णपणे नष्ट करणे. दुसरे म्हणजे, आपल्याला आपल्या सर्व ओलिसांची सुटका करावी लागेल आणि तिसरे म्हणजे, गाझा पुन्हा कधीही इस्रायलसाठी धोका बनू नये.

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पेनसिल्व्हेनियातील एका रॅलीत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले होते. निवडणूक रॅलीदरम्यान त्यांच्यावर गोळीबार झाला, एक गोळी त्यांच्या कानाला घासून गेली. या घटनेनंतर सुमारे ६४ दिवसांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी ट्रम्प ( Donald Trump )  फ्लोरिडातील पाम बीच काउंटीच्या आंतरराष्ट्रीय गोल्फ क्लबमध्ये होते. या हल्ल्यानंतर इराणवर आरोप होऊ लागले आहेत.

Web Title: If anything happens to me, Iran will not be seen on Earth Donald Trump warns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.