शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

16 व्या वर्षी झाला बलात्कार, पण 32 व्या वर्षापर्यंत बाळगलं मौन; प्रसिद्ध अभिनेत्रीचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 13:40 IST

Padma Lakshmi : सुप्रसिद्ध मॉडेल, लेखिका, अभिनेत्री आणि अमेरिकन टीव्ही पर्सनॅलिटी पद्मा लक्ष्मीने जवळपास 32 वर्षांनंतर आपल्या खासगी आयुष्यासंदर्भातील मोठा गौप्यस्फोट केला आहे.

नवी दिल्ली - सुप्रसिद्ध मॉडेल, लेखिका, अभिनेत्री आणि अमेरिकन टीव्ही पर्सनॅलिटी पद्मा लक्ष्मीने जवळपास 32 वर्षांनंतर आपल्या खासगी आयुष्यासंदर्भातील मोठा गौप्यस्फोट केला आहे. वयाच्या 16 व्या वर्षी बलात्कार झाल्याचा धक्कादायक खुलासा पद्मा लक्ष्मीने केला आहे.या घटनेसंदर्भात तिनं 'द न्यू यॉर्क टाइम्स'मध्ये खुले पत्र लिहिले आहे. आतापर्यंत या घटनेची वाच्यता कोठे का केली नाही, याबाबतची माहिती लक्ष्मीने या पत्राद्वारे दिली आहे. 

आपल्या खुल्या पत्रात लक्ष्मीनं म्हटले आहे की, आकर्षक आणि सुंदर व्यक्तिमत्त्व असलेल्या एका 23 वर्षीय तरुणासोबत मी डेटिंग सुरू केले होते. डेटिंगच्या काही महिन्यानंतर नववर्षांच्या संध्याकाळी त्यानं माझ्यावर बलात्कार केला.  या सर्व प्रकारावर आतापर्यंत मौन का बाळगलं, यावर पद्मा लक्ष्मीने खुले पत्र लिहून खुलासा केला आहे. 

''जेव्हा मी सात वर्षांची होते तेव्हा सावत्र वडिलांच्या कोण्या एका नातेवाईकानं माझ्या पायांच्यामध्ये घाणेरड्या पद्धतीनं स्पर्श केला आणि माझा हात आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला होता. आईवडिलांकडे याची तक्रार केल्यानंतर मला भारतात आजी-आजोबांकडे रवाना करण्यात आले. या घटनेतून मला असा धडा मिळाला की, आपण जर अन्यायाविरोधात आवाज उठवला तर तुम्हाला बाहेरचा मार्ग दाखवला जातो'', असे लक्ष्मीनं पत्रात म्हटले आहे.

लक्ष्मीनं असंही लिहिलं आहे की, या घटनेमुळे माझ्यावर आणि विश्वास ठेवण्याच्या माझ्या क्षमतेवर वाईट परिणाम झाला. यासंदर्भात माझ्या साथीदारासोबत आणि मानसोपचारतज्ज्ञांसोबत बोलण्यासही मला कित्येक वर्षे लागली.  

पद्मा लक्ष्मीनं मौन का सोडले? अमेरिकेतील सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश पदासाठीचे उम्मेदवार ब्रेट केवेनॉ वर दोन महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप केल्याचे वृत्त समोर आले. यानंतर गेल्या कित्येक दशकांपासून अत्याचार सहन करणाऱ्या पीडितांच्या अन्यायाला वाचा फुटू लागली, याचदरम्यान पद्मा लक्ष्मीनंही आपली हकिकत सांगितली. पद्मा लक्ष्मीवर झालेल्या अत्याचाराची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही दखल घेतली. ''बलात्कारानंतर तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार नोंदवायला हवी होती'', असे ट्विट ट्रम्प यांनी केले होते.

कोण आहे पद्मा लक्ष्मी?2003मध्ये 'बूम' सिनेमामध्ये कतरिना कैफसोबत दिसली होती. पद्मा लक्ष्मी प्रसिद्ध लेखिका, अभिनेत्री आहे. 2004 मध्ये लक्ष्मीनं लेखक सलमान रुश्दी यांच्यासोबत विवाह थाटला. पण त्याचं नाते फार काळ टिकू शकले नाहीत. 2007मध्ये या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :Rapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारी