हल्ली विवाहित व्यक्तींसोबत अफेअर, रिलेशन आणि लग्न करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामधून नात्यामध्ये वेगळीच गुंतागुंत निर्माण होत आहे. त्यातच यापैकी कुणी अतिश्रीमंत असेल तर नात्यामधील गहिरेपण, आत्मियता, ओढ वगैरे दुय्यम ठरून सारा काही पैशांचा खेळच होऊन जातो. असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. एक प्रसिद्ध उद्योजक आणि कंपनीची मालक असलेल्या महिलेचं कंपनीतील एका कर्मचाऱ्यासोबत अफेअर सुरू झालं. त्याला मिळवण्यासाठी कंपनीची मालकीण असलेल्या या महिलेने त्याच्या पत्नीला तब्बल ३.७ कोटी रुपये दिले. मात्र त्यानंतर जे काही घडलं ते तिच्यासाठी धक्कादायक होतं.
झू असं या माहिलेचं नाव असून, तिची चीनमधील चोंगकिंग शहरामध्ये एक कंपनी आहे. तिथेच झू हिचं कंपनीतील एका कर्मचाऱ्यासोबत अफेअर सुरू झालं. त्याला मिळवण्यासाठी झू हिने तिचा बॉयफ्रेंड असलेल्या या कर्मचाऱ्याच्या पत्नीला तब्बल ३.७ कोटी रुपये दिले. मात्र काही दिवस एकत्र राहिल्यानंतर आपल्यात आणि आपल्या जोडीदारामध्ये बऱ्याच विसंगती आहेत, याची जाणीव झाली. त्यानंतर तिने बॉयफ्रेंडपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. एवढंच नाही तर तिने बॉयफ्रेंडला सोडण्याच्या बदल्यात दिलेले पैसे परत देण्याची मागणी त्याच्या पत्नीकडे केली. त्यानंतर प्रकरण कोर्टात पोहोचलं.
मात्र कोर्टात झालेल्या सुनावणीवेळी झूच्या पदरी निराशा पडली. त्यानंतर सोशल मीडियावरूनही लोक झू हिला ट्रोल करत आहेत. झू हिने हे या तिच्या बॉयफ्रेंडच्या पत्नीला घटस्फोट घेण्यासाठी आणि मुलांचं पालन पोषण करण्यासाठी ३० लाख युआन म्हणजेच सुमारे ३.७ कोटी रुपये दिले होते. त्यानंतर हे याच्या पत्नीने त्याला सहजपणे घटस्फोट दिला. त्यानंतर झू ही हे याच्यासोबत राहू लागली होती. मात्र एक वर्ष एकत्र राहिल्यानंतर झू हिला हे हा आपल्यासाठी अनुरूप नसल्याची जाीव झाली. त्यानंतर झू हिने हे याच्या पत्नीला घटस्फोट घेण्यासाठी दिलेले पैसे परत मागितले. हे प्रकरण चोंगकिंगच्या कोर्टात पोहोचला. तिथे कोर्टाने सुरुवातीला झू हिच्या बाजूने निकाला दिला. तसेच पैशाच्या रूपात दिलेली ही भेट बेकायदेशीर होती आणि ती सामाजिक नियमांच्या विरोधात होती. असे सांगत हे आणि त्या पत्नीला पैसे परत देण्याचे आदेश दिले.
मात्र हे आणि त्याच्या पत्नीने या निकालाविरोधात अपील केल्यानंतर वरच्या कोर्टात हे पैसे तिने थेट भेट म्हणून दिले होते ही बाब झू सिद्ध करू शकली नाही. हे पैसे घटस्फोट आणि मुलांच्या पालनपोषणासाठी दिले होते, ही बाब कोर्टाने मान्य केली. तसेच कोर्टाने झू हिच्या हेतूवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच झू हिने तिच्याकडील आर्थिक बळाचा चुकीचा फायदा घेतल्याचा ठपकाही ठेवला. हे वर्तन अनुचित आणि चुकीचं असल्याचे निरीक्षणही कोर्टानं नोंदवलं.