मीच आहे नावेदचा कमनशिबी बाप - पाकिस्तानी नागरिकाचा दावा
By Admin | Updated: August 7, 2015 10:13 IST2015-08-07T10:01:03+5:302015-08-07T10:13:37+5:30
उधमपूरमध्ये पकडला गेलेला मोहम्मद नावेदचा मी कमनशिबी बाप असून आमच्या कुटुंबाला धोका आहे असे नावेदच्या वडिलांनी म्हटले आहे.

मीच आहे नावेदचा कमनशिबी बाप - पाकिस्तानी नागरिकाचा दावा
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - पाकिस्तानने उधमपूरमध्ये पकडला गेलेला दहशतवादी मोहम्महद नावेद हा पाकिस्तानी नागरिक असल्याचा दावा फेटाळला असला तरी असला तरी पाकमध्ये राहणारे नावेदचे वडिल मोहम्मद याकूब यांनी नावेद त्यांचाच मुलगा असल्याचे मान्य केले आहे. पाकमध्ये आमच्या जीवाला धोका आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
मोहम्मद नावेदचे वडिल मोहम्मद याकूब यांनी भारतातील एका इंग्रजी वृत्तपत्राशी दुरध्वनीद्वारे संवाद साधला. या संभाषणात त्यांनी नावेद त्यांचाच मुलगा असल्याची कबुली दिली. नावेदला सोडून द्या, पाकमधील यंत्रणा त्याच्या मागे लागली आहे, त्यांना नावेदला मारायचे आहे अशी भीतीही त्यांनी बोलून दाखवली. मोहम्मद याकूब यांनी पंजाबी भाषेत संवाद साधल्याचे संबंधीत वृत्तपत्राने म्हटले आहे.