अमेरिकेतील शटडाउनमुळे अमेरिकेतील ४० प्रमुख विमानतळांवरील शेकडो विमान उड्डाणे रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 13:36 IST2025-11-08T13:33:53+5:302025-11-08T13:36:04+5:30
अनेक कर्मचारी दुसरी अर्धवेळ नोकरी करत आहेत

अमेरिकेतील शटडाउनमुळे अमेरिकेतील ४० प्रमुख विमानतळांवरील शेकडो विमान उड्डाणे रद्द
न्यूयॉर्क : शटडाउनच्या काळात वाहतूक कमी करण्यास सांगितल्याने शुक्रवारी अमेरिकेतील ४० प्रमुख विमानतळांवरील शेकडो विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. शटडाउनच्या निर्णयाने उड्डाणांमध्ये चार टक्के कपात करण्यात आली होती. ही कपात पुढील आठवड्यात १० टक्क्यापर्यंत जाऊन चार हजार विमान उड्डाणांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. शटडाउनमुळे कर्मचारी संख्या कमी झाली आहे तसेच अनेक कर्मचारी दुसरी अर्धवेळ नोकरी करत आहेत.
न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, शिकागो, अटलांटा, मियामी, ऑर्लॅंडो, सॅन फ्रान्सिस्को यांसारख्या विमानतळांसह अनेक लहान आणि मध्यम आकाराच्या विमानतळांवरही परिणाम झाला आहे.
आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर परिणाम किती?
या शटडाऊनमुळे दररोज १,८०० उड्डाणे आणि सुमारे २.६८ लाख प्रवाशांना फटका बसत आहे. कोणताही कर्मचारी महिनाभर पगार न मिळता काम करत राहू शकत नाही, असे मिशिगनच्या केली मॅथ्यूज यांनी सांगितले. शटडाउनचा आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर मात्र परिणाम झाला नाही. अमेरिकेच्या प्रमुख शहरांमधून युरोप,आशिया, आफ्रिका, मध्य पूर्व देशांना जाणारी विमाने वेळापत्रकानुसार कार्यरत होती. ही विमान उड्डाणे वेळेवर झाली नाहीतर विमान कंपन्या अमेरिकेला जाणारी विमाने रद्द करतात, त्याचा दूरगामी होतो.
अमेरिकेतील शटडाउन
- ऑक्टोबर २०२५* ३७ दिवस
- डिसेंबर २०१८ ३४ दिवस
- जानेवारी २०१८ २ दिवस
- सप्टेंबर २०१३ १६ दिवस
- डिसेंबर १९९५ २१ दिवस
- नोव्हेंबर १९९५ ५ दिवस
- ऑक्टोबर १९९० ३ दिवस
- डिसेंबर १९८७ १ दिवस
- ऑक्टोबर १९८६ १ दिवस
- ऑक्टोबर १९८४ १ दिवस
- सप्टेंबर १९८४ २ दिवस
- नोव्हेंबर १९८३ ३ दिवस
- डिसेंबर १९८२ ३ दिवस