भरसभेत AI रोबोट भडकला, लोकांना मारण्यासाठी धावला! चीनमधून समोर आला धक्कादायक व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 17:39 IST2025-02-25T17:33:57+5:302025-02-25T17:39:42+5:30
अनेक देशांमध्ये ह्यूमनॉइड रोबोटही वापरली जात आहेत. हे रोबोट मानवाप्रमाणे काम करण्याच्या उद्देशानेच तयार करण्यात आले आहेत. मात्र, यातच चीनमधून अशाच एका रोबोटचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

भरसभेत AI रोबोट भडकला, लोकांना मारण्यासाठी धावला! चीनमधून समोर आला धक्कादायक व्हिडिओ
सध्या संपूर्ण जगभरात आर्टिफीशियल इंटेलिजन्सची जबरदस्त चर्चा सुरू आहे. हे तंत्रज्ञाना सातत्याने विकसित होत आहे. मात्र, याचा जसा फायदा, तसेच यामुळे होणारे नुकसानही कमी नाही. अगदी अलिकडचेच उदाहरण द्यायचे तर 'डीफफेक'सारख्या घटनांचे देता येईल. सध्या जगभरात एआयचा वापर केला जात आहे. अनेक देशांमध्ये ह्यूमनॉइड रोबोटही वापरली जात आहेत. हे रोबोट मानवाप्रमाणे काम करण्याच्या उद्देशानेच तयार करण्यात आले आहेत. मात्र, यातच चीनमधून अशाच एका रोबोटचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
अनियंत्रित झाला रोबोट -
चीनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सने (AI) नियंत्रित होणाऱ्या रोबोटने माणसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सॉफ्टवेअरमध्ये काही गडबड झाल्याने हा रोबट अनियंत्रित झाला आणि लोकांना मारण्यासाठी धावला. यानंतर काही लोकांनी त्या रोबोटला पकडले. ही घटना चीनमध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान घडली. यावेळी मोठ्या प्रमाणावर लोक उपस्थित होते.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यात एक ह्यूमनॉइड रोबोट लोकांवर धावून जाताना दिसत आहे. तो गर्दित शिरून लोकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात त्याला सिक्युरिटी गार्डने पकडून कंट्रोल केले आणि मागे खेचले. या काळ्या रंगाच्यारोबटला कपडेही घातलेले होते.
🚨🇨🇳AI ROBOT ATTACKS CROWD AT CHINESE FESTIVAL
— Mario Nawfal (@MarioNawfal) February 25, 2025
A humanoid robot suddenly stopped, advanced toward attendees, and attempted to strike people before security intervened.
Officials suspect a software glitch caused the erratic behavior, dismissing any intentional harm.
This comes… pic.twitter.com/xMTzHCYoQf
'शफक न्यूज'ने प्राथमिक माहितीच्या आधारे दिलेल्या वृत्तानुसार, या रोबोटच्या सॉफ्टवेअरमध्ये काही समस्या निर्माण झाली होती. यामुळे त्याचे नियंत्रण ढळले होते. महत्वाचे म्हणजे, रोबोटच्या हल्ल्यात कसल्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. मात्र, या रोबोटचे हे कृत्य भविष्यातील धोक्यांसंदर्भात विचार करयला लावणारे आहे.